पुणे

महापालिका आयुक्तांना सूचना

CD

समाविष्ट ३४ गावांतील
कर गोळा करणे थांबवा
अजित पवार यांच्या आयुक्तांना सूचना

खडकवासला, ता. १० : पुणे महापालिकेत नव्याने समाविष्ट झालेल्या ३४ गावांतील कराच्या संदर्भात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जाहीर सभेत महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांना सूचना केल्या. ‘‘सध्या शास्तीकर गोळा करणे थांबवा. लोकांना त्रास देऊ नका. कर वसुली करण्याच्या भानगडीत लगेच पडू नका’’, असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘‘या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील मार्ग काढण्याचा प्रयत्न करीत आहेत. यदाकदाचित लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास या संदर्भातला ‘जीआर’ काढता येणार नाही. परंतु लोकसभा निवडणुका झाल्यानंतर आम्ही तातडीने ‘जीआर’ काढणार. त्यातून मार्ग काढू. काळजी करू नका. निवडणुकीच्या वेळेस कोणी काही तरी माहिती सांगेल. शेवटी सरकार आपले आहे. आपण तिथे काम करतोय. त्यातून जनतेचे असे प्रश्न सोडवणार आहोत’’, असे सांगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ३४ गावांतील नागरिकांना दिलासा दिला आहे.
वारजे येथील मल्टिस्पेशलिटी हॉस्पिटलच्या उद्‍घाटनप्रसंगी आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले की, ३४ गावांचा समावेश महापालिकेत झालेला आहे. या ठिकाणी सध्या शास्तीकर तिप्पट घेतला जात आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू असताना मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना आम्ही ३४ गावांतील प्रतिनिधींसोबत भेटलो. त्यावेळेस पवारांनी देखील याबाबत सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे सांगितले. त्याबद्दल तापकीर यांनी पवार यांचे जाहीर सभेत आभार मानले.
दरम्यान, शिवणे, उत्तमनगर, कोंढवे-धावडे व न्यू कोपरे नागरी कृती समितीने वारजे येथील कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार भीमराव तापकीर यांना निवेदन दिले.

सध्या शास्तीकराचा प्रश्न ऐरणीवर आहे. अधिवेशन सुरू असताना चंद्रकांत पाटील आणि मी यासंदर्भात बैठक बोलावली. पिंपरी चिंचवड महापालिकेत शास्तीकरासंबंधी जीआर काढला. पुणे महापालिकेत देखील अशाच पद्धतीने शास्तीकरासंदर्भात जीआर काढण्यात येणार आहे. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागेल.
- अजित पवार, उपमुख्यमंत्री

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT