पुणे

‘गडकिल्ले संवर्धनासाठी स्वतंत्र महामंडळ हवे’

CD

कात्रज, ता. २७ : गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी ‘स्वतंत्र महामंडळ’ स्थापन करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे गडकिल्ले संवर्धन सेलचे प्रदेशाध्यक्ष योगेश शेलार यांनी ही मागणी केली असून, या मागणीचे पत्रही दिले आहे.
गेल्या पाच वर्षांत सातत्याने ढगफुटीसदृश पाऊस कोसळत असल्यामुळे गडकोटांचे तट, बुरूज, सीमाभिंत, पायवाटा, वाहन वाटा, पायऱ्यांकडेच्या दरडी कोसळून दुर्घटना होण्याचे प्रमाण वाढत आहे.
गडकिल्ल्यांचा भक्कमपणा कायम राहण्यासाठी प्रमुख गडांच्या सर्वेक्षणाचे काम आणि उपाययोजना करणे अत्यावश्यक असल्याची मागणी शिवप्रेमींकडून होत आहे. या पार्श्वभूमीवर गडकिल्ल्यांना पुन्हा गतवैभव प्राप्त होण्यासाठी महामंडळ स्थापन होण्याची गरज असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले. राजगडावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा सिंहासनाधीश्वर पुतळा बसवण्यात यावा, रायरेश्वर मंदिरासाठी विशेष आराखडा तयार करण्यात यावा, कात्रज येथील उड्डाणपुलाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्यात यावे, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Update : महाराष्ट्रात आज पुन्हा कोसळणार मुसळधार पाऊस! 'या' जिल्ह्यांना हवामान विभागाचा इशारा

OBC नेत्यांचा तो संशय खरा? शरद पवार फक्त मराठ्यांचे नेते यावर शिक्कामोर्तब झालंय, काय म्हणाले आंबेडकर?

Mumbai Local Train Mega Block: रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; जाणून घ्या कसे असेल शेड्यूल

Sakal Podcast: 'सनातन मंत्रालया'च्या स्थापनेची मागणी ते शेअर्स विकण्यासाठी द्यावे लागणार 'इतके' रुपये

Morning Breakfast Recipe: सकाळी नाश्त्यात बनवा कडधान्यांचे पौष्टिक ब्रेड रोल, नोट करा रेसिपी

SCROLL FOR NEXT