पुणे

बाजारात १०० ट्रक फळभाज्यांची आवक

CD

मार्केट यार्ड, ता. १८ : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डमध्ये रविवारी फळभाज्यांची आवक गेल्या आठवड्याच्या तुलनेने काहीशी वाढली आहे. मात्र, मागणी वाढल्याने टोमॅटो, हिरवी मिरची, काकडी, फ्लॉवर, गाजर आणि मटारच्या भावात वाढ झाली आहे, तर शिमला मिरचीच्या भावात घट झाली असून अन्य सर्वच फळभाज्यांचे दर स्थिर होते.
गुलटेकडी मार्केटयार्डमध्ये रविवारी (ता. १८) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ९० ते १०० ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्यांच्या आवकेमध्ये परराज्यांतून कर्नाटक, गुजरात येथून सुमारे आठ ते १० टेम्पो हिरवी मिरची, गुजरात, कर्नाटक येथून तीन ते चार टेम्पो कोबी, आंध्र प्रदेश, तमिळनाडू येथून चार ते पाच टेम्पो शेवगा, कर्नाटक येथून घेवडा दोन ते तीन टेम्पो, हिमाचल प्रदेश येथून मटार पाच ते सहा टेम्पो मटार, कर्नाटक येथून तोतापुरी कैरी तीन ते चार टेम्पो, मध्य प्रदेश येथून लसूण सुमारे आठ ते १० टेम्पो आवक झाली होती. तर स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ८०० ते ९०० गोणी, गवार तास ते आठ टेम्पो, भेंडी सात ते आठ टेम्पो, टोमॅटो सुमारे आठ हजार क्रेट, काकडी सात ते आठ टेम्पो, फ्लॉवर आठ ते १० टेम्पो, कोबी आठ ते १० टेम्पो, सिमला मिरची १० ते १२ टेम्पो, भुईमूग शेंगा सुमारे १५० ते १७५ गोणी, गावरान कैरी दोन टेम्पो, कांदा सुमारे ५० ते ६० ट्रक, इंदूर, आग्रा आणि स्थानिक भागातून बटाटा ४० ते ४२ ट्रक आवक झाली होती, अशी माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ अडते विलास भुजबळ यांनी दिली.
फळभाज्यांचे दहा किलोचे भाव- कांदा : ८०-१३०, बटाटा : १२०-२००. लसूण : ५५०-१०००, आले : १२५०-१५००, भेंडी : २००- ३५०, गवार : गावरान व सुरती : ३००-४००, टोमॅटो : २००-२८०, दोडका : ३५०-४००, हिरवी मिरची : ५००-६००, दुधी भोपळा : १५०-२५०, चवळी : २००-२५०, काकडी : २५०-३००, कारली : हिरवी : ३५०-४००, पांढरी : २५०-३००, पापडी : ४५०-५००, पडवळ : २५०-३००, फ्लॉवर : १५०-२००, कोबी : ६०-१००, वांगी : १५०-२५०, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : ६०-८०, ढोबळी मिरची : ४००-४५०, तोंडली : कळी ३५०-४००, जाड : १८०-२००, शेवगा : ४००-४५०, गाजर : २००-३००, वालवर : ३५०-४००, बीट : १४०-१६०, घेवडा : ७००-८००, कोहळा : १००-१५०, घोसावळे : २००- २५०, ढेमसे : २५०-३००, भुईमूग शेंग : ३००-४००, मटार : परराज्य: ७००-९००, पावटा : ५००- ५५०, तांबडा भोपळा : १००-१५०, कैरी तोतापुरी - १६०-२२०, कैरी गावरान : १००-१५०, सुरण : १८०-२२०, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००-१६००.

अंबाडी, मुळे, पालकच्या भावात घट
गुलटेकडी येथील मार्केट यार्डमध्ये रविवारी (ता. १८) पालेभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेने स्थिर होती. मागणी कमी झाल्याने घाऊक बाजारात चाकवत, अंबाडी, मुळे, चुका आणि पालकच्या भावात घट झाली असून शेपू, कांदापात आणि पुदिन्याच्या भावात वाढ झाली असून कोथींबीर, मेथी, करडई, राजगिरा आणि चवळईचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली़.
चाकवतच्या भावात घाऊक बाजारात गड्डीमागे चार रुपये, पालक आठ रुपये, मुळे तीन रुपये, चुका दोन रुपये आणि अंबाडीच्या भावात एक रुपयांनी घट झाली आहे. तर कांदापात पाच रुपये, शेपू आणि पुदिन्याच्या भावात दोन रुपयांनी वाढ झाली.
मार्केट यार्डात रविवारी कोथिंबिरीची एक लाख ५० हजार जुडींची आवक झाली, तर मेथीची ४० हजार जुडी इतकी आवक झाली.
पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : १५००-२५००, मेथी : १२००-२०००, शेपू : ६००-१२००, कांदापात : ८००-१५००, चाकवत : ४००-८००, करडई : ३००- ७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१२००, राजगिरा :
४००-७००, चुका : ६००-१०००, चवळई : ३००-७००, पालक : ३००-७००.

अननस, लिंबू, सीताफळाच्या भावात घट
गुलटेकडी येथील मार्केट यार्डात अननस, लिंबू आणि सीताफळाच्या भावात घट झाली असून पपई आणि चिक्कूच्या भावात वाढ झाली

आहे तर संत्री, मोसंबी, कलिंगड, खरबूज आणि पेरूचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.
रविवारी (ता. १८) मार्केटयार्ड येथील फळबाजारात केरळ येथून अननस सात ट्रक, मोसंबी २५ ते ३० टन, डाळिंब ३० ते ३५ टन, पपई १० ते १२ टेम्पो, लिंबांची सुमारे दीड ते दोन हजार गोणी, कलिंगड पाच ते सहा टेम्पो, खरबूज पाच ते सहा
टेम्पो, पेरू ४०० ते ५०० क्रेट, चिक्कू एक हजार डाग इतकी आवक झाली.
फळांचे भाव पुढीलप्रमाणे : लिंबे (प्रतिगोणी) : १००-३००, मोसंबी : (३ डझन) : २५०-४८०, (४ डझन) : १००-३१०, संत्री : (१० किलो) : ३००-१२००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ५०-२००, गणेश : ५-३०, आरक्ता १०-६०, कलिंगड : ८-२२, खरबूज : २०-३५, पपई : १०-१२, अननस (एक डझन) : १००-४५०, पेरू (वीस किलो) : २५०-४००, चिक्कू (दहा किलो) : १००-६००

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: शिंदे विरुद्ध दिघे! उद्धव ठाकरेंची खेळी; ठाणे जिल्ह्यात आठ जणांना दिली संधी

MVA Seat Sharing Formula: मविआत कोणीही मोठा किंवा छोटा भाऊ नाही! जागा वाटपांचा फॉर्म्युला जाहीर

Thackeray Group List: ठाकरे गटाची पहिली यादी जाहीर; एकनाथ शिंदेंविरोधात केदार दिघेंना उमेदवारी

Zimbabwe ने रचला इतिहास; Gambiaविरूद्ध केल्या ट्वेंटी-२० क्रिकेटमधील सर्वाधिक धावा

Latest Maharashtra News Updates Live: भाजपचे नाराज दिनकर पाटील यांचा मनसेमध्ये प्रवेश

SCROLL FOR NEXT