पुणे

काकडी, कारले, मटार, वांगी, शेवग्याच्या भावात घट मार्केट यार्ड ः लसूण आणि टोमॅटो महागले, फळभाज्यांचे भाव स्थिर

CD

मार्केट यार्ड, ता. १२ : बाजारात रविवारी फळभाज्यांची आवक मागील आठवड्याच्या तुलनेने घटली आहे. परिणामी दिवाळीमुळे फळभाज्यांना काहीशी मागणी कमी असल्याने भावामध्येही घट झाली आहे. काकडी, कारले, मटार, फ्लॉवर, वांगी आणि शेवग्याच्या भावात घट झाली आहे़. लसूण आणि टोमॅटोच्या भावात वाढ झाली आहे़, तर अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव स्थिर होते.

मार्केट यार्डात रविवारी (ता.१२) राज्याच्या विविध भागांसह परराज्यांतून सुमारे ८० ते ८५ ट्रक फळभाज्यांची आवक झाली. भाजीपाल्याच्या आवकेमध्ये परराज्यांतून झालेल्या आवकेमध्ये गुजरात, कर्नाटक येथून हिरवी मिरची सुमारे पाच ते सहा टेम्पो, कर्नाटक, गुजरात येथून कोबी तीन ते चार टेम्पो, आंध्र प्रदेश तमिळनाडू येथून दोन टेम्पो शेवगा, राजस्थानातून येथून दोन टेम्पो गाजर, कर्नाटक येथून घेवडा दोन ते तीन टेम्पो, मध्यप्रदेश येथून लसूण सुमारे पाच ते सहा टेम्पो आवक झाली होती.
स्थानिक भागातून झालेल्या आवकेमध्ये सातारी आले सुमारे ४०० ते ५०० गोणी, गवार सुमारे तीन ते चार टेम्पो, भेंडी तीन ते चार टेम्पो, टोमॅटो सुमारे पाच ते साडेपाच हजार क्रेट्स, हिरवी मिरची पाच ते सहा टेम्पो, काकडी पाच ते सहा टेम्पो, सिमला मिरची नऊ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा आठ ते १० टेम्पो, फ्लॉवर आठ ते १० टेम्पो, कोबी चार ते पाच टेम्पो, पावटा दोन ते तीन टेम्पो, कांदा सुमारे ५० ते ६० ट्रक, इंदूर, आग्रा, स्थानिक भागातून बटाटा ३० ट्रक इतकी आवक झाली असल्याची माहिती मार्केटयार्ड येथील ज्येष्ठ अडतदार विलास भुजबळ यांनी दिली.

फळभाज्यांचे दहा किलोचे भाव ः कांदा : ३५०-४३०, बटाटा : १००-२००. लसूण : ११००-१९००, आले सातारी : ९५०-११००, भेंडी : २५०- ३५०, गवार : गावरान व सुरती ४००-६००, टोमॅटो : २००-२५०, दोडका : २००-२५०, हिरवी मिरची : २५०-३५०, दुधीभोपळा : १००-२००, चवळी : २५०-३००, काकडी : १५०-२००, कारली : हिरवी १००-१५०, पांढरी : १००-१५०, पापडी : ३००-४००, पडवळ : १२०-१५०, फ्लॉवर : ८०-१००, कोबी : ८०-१२०, वांगी : १००-२००, डिंगरी : २००-२५०, नवलकोल : १००-१२०, ढोबळी मिरची : ३००-३५०, तोंडली : कळी ३००-३५०, जाड : १५०-१६०, शेवगा : ५००-६००, गाजर : १५०-५५०, वालवर : ४००-४५०, बीट : १४०-१५०, घेवडा : ३००-४००, कोहळा : १००-१५०, आर्वी: २००-२५०, घोसावळे : २००- २५०, ढेमसे : ३००-३५०, भुईमूग शेंग : ६००-७००, मटार : परराज्य : ७००-७५०, पावटा : ४००- ४५०, तांबडा भोपळा : १००-१५०, सुरण : १८०-२००, मका कणीस : ५०-१००, नारळ (शेकडा) : १०००- १६००.


पालेभाज्यांच्या भावात घसरण
गुलटेकडी येथील मार्केटयार्ड घाऊक बाजारात गेल्या आठवड्याच्या तुलनेत कोथींबीर, मेथी, शेपू, कांदापात, मुळे आणि पालकच्या भावात घट झाली आहे, तर चुका महागला असून चाकवत, करडई, पुदीना, अंबाडी आणि राजगिऱ्याचे भाव स्थिर होते. रविवारी (ता. १२) कोथिंबिरीची तब्बल दोन लाख, तर मेथीची सव्वा लाख जुडी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. कोथींबीर आणि मेथीच्या भावात मोठ्या प्रमाणात घसरण झाली असून घाऊक बाजारात शेकड्यामागे प्रत्येकी ८०० रुपयांनी घसरण झाली आहे. तसेच पालक, मुळे आणि कांदापातीच्या भावात प्रत्येकी ३०० रुपये, शेपू प्रत्येकी २०० रुपये, तर चवळीच्या भावात
१०० रुपयांनी घसरण झाली आहे, तर चुक्याच्या भावात २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

पालेभाज्यांचे शेकड्यातील भाव : कोथिंबीर : ६००-१२००, मेथी : ५००-८००, शेपू : ६००-१२००, कांदापात : ८००-१२००, चाकवत : ४००-७००, करडई : ३००-७००, पुदीना : ३००-८००, अंबाडी : ४००-७००, मुळे : ८००-१२००, राजगिरा : ४००-७००, चुका : ६००-१०००, चवळई : ३००-६००, पालक : ८००-१५००.

मोसंबी महागली तर लिंबाच्या भावात घट
गुलटेकडी मार्केटयार्ड फळबाजारात रविवारी (ता. १२) मोसंबीच्या भावात वाढ झाली असून लिंबाच्या भावात घट झाली आहे तर कलिंगड, खरबूज, पपई, सीताफळ, चिक्कू, पेरू, अननस, संत्री, डाळिंबाचे भाव स्थिर असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली. दरम्यान दिवाळीमुळे फळांना मागणी कमी असल्याचेही व्यापाऱ्यांनी दिली.

गुलटेकडी येथील मार्केटयार्डमध्ये रविवारी केरळ येथून अननस पाच ट्रक, मोसंबी ६० ते ७० टन, संत्री २० ते २५ टन, डाळिंब २० ते २५ टन, पपई एक ते दोन टेम्पो, लिंबांची सुमारे १००० ते १२०० गोणी, कलिंगड दोन ते तीन टेम्पो, खरबूज एक ते दोन टेम्पो, सीताफळ २० ते २५ टन, चिक्कू एक हजार बॉक्स, इतकी आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

फळांचे भाव पुढीलप्रमाणे ः लिंबे (प्रतिगोणी) : ३००-६००, मोसंबी : (३ डझन): १६०-३२०, (४ डझन) : ६०-१५०, संत्री : (१० किलो) : १५०-६००, डाळिंब (प्रतिकिलोस) : भगवा : ६०-२००, गणेश : १०-३०, आरक्ता १०-७०, कलिंगड :
८-१२, खरबूज : १५-२५, पपई : १५-३०, चिक्कू (दहा किलो) : १००-५००.


फुलबाजार
दिवाळीमुळे फुलांना मागणी वाढली आहे. चांगल्या मालाचे दर वाढले आहेत. अवकाळी पावसामुळे बाजारात पन्नास टक्के माल खराब येत आहे. फुलांचे प्रतिकिलोचे दर पुढीलप्रमाणे : झेंडू : २०-१२०, गुलछडी : १००-२००, अ‍ॅष्टर : जुडी १०-२०, सुट्टा ६०-१२०, कापरी : ३०-८०, शेवंती : ३०-८०, (गड्डीचे भाव) गुलाबगड्डी : ३०-६०, गुलछडी काडी : ३०-१३०, डच गुलाब (२० नग) : ६०-१५०, जर्बेरा : ३०-५०, कार्नेशियन : ५०-१००, शेवंती काडी १००-२००, लिलियम (१० काड्या) ८००-१०००, ऑर्चिड ५००-६००, ग्लॅडिओ (१० काड्या) : ८०-१३०, जिप्सोफिला : १००-१५०, जुई : ७००-१०००, चमेली : ४००-८००.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manipur Politics: मणिपूरमध्ये भाजप सरकार पडणार? मोठ्या पक्षानं पाठिंबा काढून घेतला, अडचणी वाढल्या!

Viral Video: तू T20 संघात राहण्यासाठी पात्र नाहीस... Babar Azam ला फॅन्सने तोंडावर अपमान करताच राग अनावर

Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी पंकजा मुंडेंचे मानले जाहीर आभार ! म्हणाले, तू महाराष्ट्राच्या डोळयावरची पट्टी काढली अन् ...

फायर नहीं वाइल्ड फायर..! बहुप्रतिक्षित Pushpa 2 चा Trailer रिलीज; पण लाँचसाठी पाटणाची निवड का केली?

Baba Siddique Murder Case : बाबा सिद्दीकी हत्याकांडातील आरोपी सलमानभाई वोहरा पोलिसांच्या जाळ्यात

SCROLL FOR NEXT