पुणे : आरोग्यास फायदेशीर असलेली पितळ, तांबा, कासा या मग दोघेही धातूंप्रमाणेच दगड आणि मातीपासून बनविलेल्या स्वयंपाकाच्या भांड्यांचा वापर आता पुन्हा वाढत आहे. ‘झिस्टा’ या स्टार्टअपने याबाबत पुढाकार घेतला असून त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. या भांड्याचा वापर वाढावा म्हणून झिस्टाने शक्रवार ते शनिवार (ता. २७ ते २९) दरम्यान प्रदर्षन आयोजित केले होते.
देशांत पारंपरिक पद्धतीत स्वयंपाक करताना धातूंपासून तयार केलेल्या भांड्यांचा वापर केला जात होता. परंतु या भांड्यांचा वापर कमी होत गेला. देशाच्या काही भागांत माती, दगडाची भांडी, दगडापासून बनविलेल्या भांड्याचा तसेच कडुनिंबाच्या झाडापासून केलेल्या बनविलेल्या काही भांड्यांचा वापर साठवणुकीसाठी केला जात होता.
भांड्याचा वापर आरोग्यास चांगला असल्याने त्यास पसंती आहे. याबाबत स्टार्टअपचे सहसंस्थापक अर्चिस माधवन म्हणाले, देशातील विविध भागातील कारागिरांकडून ही भांडी तयार करून घेतली जात आहेत.
पंजाबमधील जंडीयाला, कर्नाटकातील सेलम, केरळमधील मदुराई, पुण्यातील तांबट आळी, मणिपूर, पश्चिम बंगाल या भागातील हे कारागीर आहेत. संस्थेशी ६५० कारागीर जोडले गेले आहेत. जगातील २२ देशांत आम्ही या भांड्यांची निर्यात करत आहोत. पुण्यात आयोजित प्रदर्शनास नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.