traffic jam from Khadakwas Chowpatty due to rush of tourists pune  Sakal
पुणे

Pune News : पर्यटकांच्या गर्दीमुळे खडकवासला चौपाटीला वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

खडकवासला : अवकाळी पाऊस सध्या सुरू आहे. परिणामी तसेच सुट्ट्या देखील सुरू आहेत. परिणामी पर्यटकांची पावलं आपोआपच खडकवासला, सिंहगड परिसरात आज पडत आहे. पर्यटकांच्या अचानक वाढलेल्या गर्दीमुळे रविवारी खडकवासला‌ चौपाटी ते डोणजे चौकापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री सव्वा नऊ वाजता वाहतूक सुरळीत झाली.

चौपाटी परिसरात दोन्ही बाजूला पर्यटकांच्या वाहनांचे पार्किंग असल्यामुळे पुणे पानशेत रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. मे महिन्याच्या सुट्ट्या सुरू आहेत. आज लग्नाची तारीख देखील होती. दोन दिवसापासून अवकाळी पाऊस सुरू आहे. उन्हाची तीव्रता कमी झाली आहे. आज मे महिन्यातील दुसरा रविवार मातृत्व दिन आहे. पर्यटकांचा ओढा आज सिंहगड, खडकवासला, खानापूर, पानशेत परिसरात होता.

सकाळ पासून विविध ठिकाणी गेलेले पर्यटक संध्याकाळी चार नंतर खडकवासला चौपाटीच्या दिशेने येतात. तसेच संध्याकाळी अनेक जण पुण्यातून थेट चौपाटीला येतात. यामुळे वाहने लावण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे दुसऱ्या बाजूला देखील पार्किंग वाहने थांबली होती. यामुळे रस्ता अरुंद झाला आणि वाहतूक कोंडी झाली होती.

स्थानिकांची पोलिसांना मदत

खडकवासला धरण चौकात देखील वाहतूक कोंडी होत होती. यावेळी खडकवासला परिसरातील स्थानिक, शिवसेनेचे संतोष शेलार व त्यांचे सहकारी यांनी चौकातील वाहतूक सुरळीत करण्यास काही काळ पोलिसांना मदत केली. त्याचबरोबर पर्यटकांनी देखील स्थानिक पातळीवरील वाहतूक सुरळीत करण्यात मदत केली. चौपाटी येथील विक्रेत्यांनी देखील मदत केली.

आम्ही कोंढणपूरला लग्नाला गेलो होतो. तिकडून सिंहगड मार्गे परत येताना गोऱ्हे बुद्रुक पासून पुढे वाहनांचा वेग कमी झाला. डीआयएटी ते खडकवासला परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. रात्री साडेआठ वाजता हे अंतर‌ पार करण्यासाठी पंधरा वीस मिनिटं वेळ दाखवत होता. वाट पाहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता.

-महेश धावडे, स्थानिक

पुणे शिरूर आणि मावळ येथील निवडणुकीसाठी हवेली पोलीस ठाण्यातील अधिकारी कर्मचारी बंदोबस्ताला गेले आहेत. त्यामुळे पोलीस ठाण्यामध्ये कर्मचारी अधिकारी नव्हते. वाहतूक कोंडी झाल्याची माहिती मिळतात घटनास्थळी पोलीस पाठवले. वाहतूक कोंडी नव्हती. चौपाटी परिसरात दोन्ही बाजूला पार्किंग झाल्यामुळे वाहनांचा वेग कमी झाला होता. वाहने संथ गतीने पुढे सरकत होती. त्यांनी स्थानिकांच्या मदतीने वाहतूक कोंडी सोडवण्याचा प्रयत्न केला.

-सचिन वांगडे प्रभारी पोलीस निरीक्षक हवेली पोलीस ठाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT