पुणे

राजगुरुनगरला दोन किलोमीटरपर्यंत रांगा

सकाळवृत्तसेवा

राजगुरुनगर - राजगुरुनगर शहरामधून जाणाऱ्या पुणे-नाशिक महामार्गावरील भीमा नदीच्या पुलाच्या कठड्याला टेम्पो धडकल्यामुळे वाहतूक अडकून आज गुरुवारी (ता. ४) दुपारपर्यंत वाहतूक कोंडी झाली. यामुळे दोन किलोमीटर वाहनांच्या रांगा लागल्या. वाहतूक कोंडीने वाहनचालक, प्रवासी आणि वाहतूक पोलिसही वैतागून गेले.

आज पहाटे पाचच्या सुमारास हा टेम्पो पुलाच्या कठड्याला धडकून कठड्यावरच अडकला. या घटनेमुळे सकाळपासून वाहतूक कोंडीला सुरुवात झाली. पुण्याच्या बाजूला शिरोलीपर्यंत आणि मंचरच्या बाजूला खेड घाटापर्यंत वाहनांच्या रांगा गेल्या. पोलिसांनी वाहतुकीचे नियमन करूनही वाहतूक कोंडी होतच होती. मुळातच अरुंद असलेल्या भीमा नदीवरील पुलावरच वाहतूक अडकल्यामुळे जास्तच वाहतूक कोंडी झाली. वाहतूक कोंडीतून सुटण्यासाठी चालक आडव्यातिडव्या गाड्या घुसवत होते. त्यातून जास्तच कोंडी होत होती. अर्धा तास राजगुरुनगर ओलांडण्यासाठी लागत होते. त्यामुळे प्रवासी आणि वाहनचालक अक्षरशः वैतागले होते. एस. टी. बस आणि खासगी वाहनाने येणारे राजगुरुनगरकर भीमा नदीच्या पुलाजवळ उतरून पायी गावात येत होते. 

वाडा रस्त्यावरही कोंडी
पुलावरच वाहतूक कोंडी झाल्याने पुढेही सरकता येईना आणि मागेही जाता येईना, अशी अडचण झाली. दुपारपर्यंत वाहतूक कोंडी कमी झाली नव्हती. महामार्गावरच्या या वाहतूक कोंडीमुळे गावातून जाणाऱ्या वाडा रस्त्यावरही वाहतूक कोंडी होत होती. त्यामुळे राजगुरुनगरमध्ये जाणे-येणे त्रासदायक झाले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Uddhav Thackeray: चंद्रचूड साहेब न्याय देण्याऐवजी टिप्पणीकार झाले होते; उद्धव ठाकरेंनी माजी सरन्यायाधीशांवर व्यक्त केली नाराजी

"आम्ही धनगर समाजाचा मुख्यमंत्री करून न्याय दिला, मात्र महाराष्ट्रात धनगरांना साधं आरक्षण दिलं जात नाही"

मोठी बातमी: रोहित शर्मा पहिल्या कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियात होतोय दाखल, सोबत भारी गोलंदाजही टीम इंडियाच्या मदतीला येतोय

Israel PM Netanyahu: इस्रायली पंतप्रधानांच्या घरावर बॉम्ब हल्ला; संरक्षण मंत्री म्हणाले, आता हद्द झाली...

Latest Maharashtra News Updates live : बाळासाहेब ठाकरे पुतळ्याला शिवसेना (उबाठा) पक्षाचे अभिवादन

SCROLL FOR NEXT