IAS Pooja Khedkar Audi Car 
पुणे

IAS Pooja Khedkar: पूजा खेडकरची 'लाल दिव्याची' गाडी अखेर पोलिसांच्या ताब्यात; पाहा व्हिडिओ

Audi Car Pooja Khedkar: पूजा खेडकरने तिच्या ऑडी कारमध्ये लाल दिवा लावला आणि त्यावर 'महाराष्ट्र सरकार' असे लिहिलेल्याचा आरोप आहे.

आशुतोष मसगौंडे

प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकरच्या बाबतीत रोज नवनवीन गोष्टी समोर येत आहेत. पूजा खेडकरने तिच्या ऑडी कारमध्ये लाल दिवा लावला आणि त्यावर 'महाराष्ट्र सरकार' असे लिहिलेल्याचा आरोप आहे.

आता या प्रकरणात पूजा खेडकरने वापरलेली ऑडी कार वाहतूक विभागाने चतुःश्रृंगी पोलिस ठाण्यात आणली आहे. पुढील तपासणी आणि कागदपत्र पडताळणीसाठी कार पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.

पुणे आरटीओने ही कार ज्या कंपनीच्या नावावर आहे त्यांच्यावर कारवाई करण्याची तयारी केली होती. आरटीओच्या अधिकाऱ्याने सांगितले की, 'पुणे आरटीओने गुरुवारी संध्याकाळी एका खासगी कंपनीला नोटीस बजावली. कार क्रमांक MH-12/AR-7000 ही कंपनीच्या नावावर नोंदणीकृत होती. नोंदणी केलेल्या वापरकर्त्याचा पत्ता हवेली तालुक्यातील शिवणे गाव असा देण्यात आला आहे, त्यामुळे लवकरात लवकर तपास करता यावा, यासाठी कंपनीला नोटीसमध्ये कार पोलीस स्टेशनमध्ये आणण्याचे निर्देश देण्यात आले होते. पुणे आरटीओने आपल्या फ्लाइंग स्क्वॉडला कारचा शोध घेण्यासाठी आवश्यक कारवाई करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यानंतर आज पोलिसांना ही कार सापडली आहे.

खेडकरचे प्रताप

खेडकर यांची प्रशिक्षणासाठी पुणे जिल्ह्यात निवड झाल्यानंतर जिल्ह्यातील विविध शासकीय कार्यालयांमध्ये त्यांच्या प्रशिक्षणाचा कार्यक्रम निश्चित केला होता. खेडकर तीन जूनला जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशिक्षणासाठी रुजू झाल्या. याठिकाणी त्यांनी केलेल्या अवास्तव मागण्या, खेडकर यांच्या वडिलांनी पूजा यांना विविध प्रकारच्या सुविधा देण्याबाबत सर्वसाधारण शाखेच्या तहसीलदारांना अयोग्य शब्दप्रयोग वापरणे, अपर जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी न घेता त्यांच्या अनुपस्थितीत त्यांच्या खासगी दालनातील सर्व साहित्य बाहेर काढून तेथे स्वत:चे कार्यालय स्थापन करणे आदी प्रकार केले. त्यातून या प्रकरणाला वाचा फुटली.

शेतकऱ्यांबरोबर वाद

खेडकर कुटुंबीयांची मुळशी तालुक्यात २५ एकर जमीन आहे. त्यावरून शेजारच्या शेतकऱ्यांबरोबर वाद आहेत.

पुणे जिल्हा पोलिस अधीक्षकांकडे प्रशिक्षणासाठी असताना खेडकर या अधीक्षकांनी दिलेले शासकीय वाहन न घेता खासगी वाहनातून पौड पोलिस ठाण्यात गेल्या.

या जमिनीच्या प्रकरणात त्यांनी संबंधित वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांवर दबाव टाकल्याचे जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या अहवालात नमूद केल्याचे विश्‍वसनीय सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral News: ..आणि चितेवरील पार्थिव उठले, स्मशानभूमीत झाला गोंधळ ! तीन डॉक्टर निलंबित, काय घडलं नेमकं?

Latest Maharashtra News Updates : अजित पवार रेकॉर्डब्रेक मताधिक्यानं जिंकणार - सूरज चव्हाण

Ulhasnagar Crime : उल्हासनगरातील 'त्या' चिमुकलीची मामानेच हत्या केल्याचा उलगडा

Phulambri Assembly Election Voting : मतांच्या विभाजनावर ठरणार उमेदवारांचे भवितव्य..!

Mahim Constituency: 'काकां'नी भाजपसाठी डाव आखला; मात्र पुतण्याच गमिनीकाव्यात अडकला, माहीममध्ये मोठी उलथापालथ!

SCROLL FOR NEXT