पुणे शहरात सुरू असलेले प्रकल्प उदा नदी काठ सुधार योजना, प्रस्तावित बालभारती ते पौंड फाटा रस्ता आदी गोष्टींसाठी होत असलेली वृक्षतोड या संदर्भात जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मंगळवारी माहिती घेतली.
पुणे - शहरात सुरू असलेले प्रकल्प उदा नदी काठ सुधार योजना, प्रस्तावित बालभारती ते पौंड फाटा रस्ता आदी गोष्टींसाठी होत असलेली वृक्षतोड या संदर्भात जेष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांनी मंगळवारी माहिती घेतली.
बालभारती ते पौंड फाटा प्रस्तावित रस्त्या संदर्भात एरंडवणे येथील कांचन गल्लीत 'वेताळ टेकडी बचाव कृती समिती'च्या सदस्यांशी भेट घेऊन यावेळी शहरात सुरू असलेल्या विविध प्रकल्पासंदर्भात चर्चा करून वृक्षतोड संदर्भात माहिती घेतली.यासह महाराष्ट्रात पर्यावरणाविषयी असलेल्या चळवळीची स्थिती, वृक्षारोपनाची नवीन पद्धत, प्रशासन आणि नागरिकांची भूमिका आदी गोष्टींची चर्चा करण्यात आली.
यावेळी शिंदे म्हणाले, 'शहरात झपाट्याने वृक्षतोड होत आहे. प्रशासनाने नागरिकांना विश्वासात घेतले पाहिजे. पर्यावरण राखणे काळाजी गरज आहे. पुण्यात सध्या ज्या झपाट्याने वृक्ष तोड सुरु आहे ते चिंताजनक आहे. नागरिकांनी प्रशासनाची चर्चा करताना सकारात्मकता असायला हवी. सातत्याने प्रशासनाबरोबर पाठपुरावा करायला हवा. वृक्ष लागवड करताना येत असलेल्या समस्या. प्रशासनाने नागरिकांच्या बरोबरीने काम करणे गरजेचे आहे.
पुढील काही दिवसात महापालिका आयुक्त व संबंधित खात्याच्या प्रमुखांबरोबर बैठक घेणार असून त्यांच्याबरोबर चर्चा करणार आहे. प्रशासनाबरोबर काम करताना आलेले अनुभव कथन केले".यावेळी वेताळ टेकडी बचाव कृती समितीच्या सदस्यांनी विविध मुद्द्यांवर शिंदे यांच्याबरोबर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने टेकडी वाचवणे, पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये, प्रस्तावित रस्ते डीपी (डेव्हलपमेंट प्लॅन) मधून कढणे आदी गोष्टींची चर्चा करण्यात आली. यावेळी वेताळ टेकडी बचाव कृती समितीचे सदस्य प्राजक्ता दिवेकर, सचिन बहिरट, सुषमा दाते, परेश लोढा, अंगद पटवर्धन, अवंती गाडगीळ, हर्षवर्धन रानडे आदी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.