हर्षवर्धन पाटीलांच्या वाढदिवसानिमित्त देशीरोपांचे वाटप  
पुणे

इंदापूर : हर्षवर्धन पाटीलांच्या वाढदिवसानिमित्त देशीरोपांचे वाटप

देशी औषधी गुणधर्म असलेल्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलन करण्यात आले

डाॅ. संदेश शहा

इंदापूर : राज्याचे माजी सहकार मंत्री व भाजपाचे नेते हर्षवर्धन पाटील (harshvardhan patil) यांच्या ५८ व्या वाढदिवसा निमित्त इंदापूर तालुका शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय, महाविद्यालयीन पतसंस्था, श्री नारायणदास रामदास हायस्कूल व सेवक पत संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने औषधी गुणधर्म असलेल्या ५८०० बेल तसेच देशीरोपांचे वाटप प्रातिनिधिक स्वरूपात हर्षवर्धन पाटील यांच्या हस्ते महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांना करण्यात आले. यावेळीसंस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांचा सहसचिव बाळासाहेब खटके, विश्वस्त ऍड. मनोहर चौधरी, प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांच्या हस्ते सत्कार झाला.

यानिमित्त महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.संजय चाकणे म्हणाले, महाविद्यालयात गेल्या दहा वर्षापासून संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांचा वाढदिवस तसेच महाविद्यालयात येणाऱ्या मान्यवरांच्या हस्ते ५ हजारहुन जास्त डेरेदार सावली देणारे, देशी औषधी गुणधर्म असलेल्या रोपांचे वृक्षारोपण करून पर्यावरण संतुलन करण्यात आले आहे. देशी रोपांच्या माध्यमातून ऑक्सीजन पार्क उभा करण्याचा आमचा संकल्प आहे.

बेल वृक्षात आरोग्यवर्धक अनेक गुण असून पोट दुखी ते मधुमेह समस्यांवर बेल गुणकारी आहे. त्यामुळे पचनशक्ती, स्मरणशक्ती वाढवणार्‍या बेलवृक्षाचे वृक्षारोपण तसेच देशी वनस्पतींचे वृक्षारोपण करून नैसर्गिक ऑक्सिजननिर्मिती साठी महाविद्यालय वेळोवेळी विविध उपक्रमातून नैसर्गिक पर्यावरण संवर्धनासाठीप्रयत्नशील असते.

यावेळी सायन्स विभाग प्रमुख डॉ. शिवाजी वीर, कला विभाग प्रमुख डॉ.भिमाजी भोर, वाणिज्य विभागप्रमुख डॉ.सदाशिव उंबरदंड, क्रीडा संचालक डॉ.भरत भुजबळ, महा- विद्यालयीन पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा.उत्तमराव माने, सचिव प्रा.मनोहर बेद्रे, श्रीनारायणदास रामदास सेवक पतसंस्थेचे संचालक सतीश व्यवहारे, सचिव सुनील माळी, सर्वसहकारी प्राध्यापक यावेळी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur South Assembly Election 2024 Results : कोल्हापुरात बंटी नाही, आता महाडिक पॅटर्न! ऋतुराज पाटलांचा पराभव करत अमल महाडिकांचा दणदणीत विजय

Shirdi Assembly Election 2024 Final Result Live: शिर्डीत विखे पाटलांनी राखली जागा! सोळाव्या फेरीनंतर काँग्रेसच्या घोगरेंचा पराभव निश्चित

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: सुनील शेळके १ लाख २ हजार ९६७ मतांनी आघाडीवर

Eknath Shinde Reaction : एकनाथ शिंदेंची विजयानंतर पहिली प्रतिक्रिया, लाडक्या बहिणींमुळे...

Bandra East Assembly Constituency Results: 'मातोश्री'च्या अंगणात पुन्हा शिवसेना? वरुण सरदेसाई यांनी मारली मुसंडी; झिशान सिद्दीकी पिछाडीवर

SCROLL FOR NEXT