Navale Bridge Accident 
पुणे

Navale Bridge Accident: नवले पुलाजवळ कंटेनर आणि ट्रकचा अपघात कसा झाला? 4 जणांचा होरपळून मृत्यू

कार्तिक पुजारी

पुणे- अपघाताचे प्रमाण जास्त असलेल्या नवले पुलाजवळ पुन्हा एकदा भीषण अपघात झाला आहे. कंटेनर आणि ट्रकच्या अपघातात चार जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. स्वामी नारायण मंदिराजवळ कंटेनर उभा होता. यावेळी साताऱ्याच्या दिशेने आलेला ट्रक कंटेनरला धडकला. यामुळे ट्रकने पेट घेतला. ट्रकमधील चार जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.

अपघातासाठी नवले ब्रिज कूप्रसिद्ध होत आहे. आता पुन्हा एकदा याठिकाणी अपघात झाल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. अपघाताची घटना घडताच अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. अपघातामुळे या मार्गावर काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. पण, पोलिसांच्या मदतीने वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे. (truck catches fire after accident near Navale Bridge in Pune Mumbai Bengaluru highway)

दुर्घटनेत दोघे जण जखमी झाले आहेत. त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृत्यूमुखी पडलेल्या चार जणांची ओळख पटलेली नाही, पण ते एकाच कुटुंबातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हे सर्व ट्रकच्या कॅबिनमध्ये बसले होते. घटनास्थळीच चार जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले होते. यात एक महिला आणि लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची सूचना मिळतात अग्निशमन दलाचे अधिकारी व जवान घटनास्थळी पोहोचले होते.

रात्री साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडल्याची माहिती आहे. रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या कंटेनरला ट्रकने धडक दिली. त्यामुळे ट्रकला आग लागली. यात ट्रकमध्ये असलेल्या चौघांचा होरपळून मृत्यू झालाय. दरम्यान, नवले पुलाजवळ वारंवार अपघाताच्या घटना घडत आहेत. त्यामुळे येथील पुलाची रचना आणि रस्त्याचा उतार धोकादायक असल्याचं स्पष्ट होत आहे. यावर कायमस्वरुपी उपाय करण्याची मागणी होऊ लागली आहे. (Latest Marathi News)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mahayuti Manifesto: महायुतीकडून कोल्हापूरच्या प्रचार सभेत वचननामा जाहीर; जनतेला दिली ‘ही’ १० आश्वासनं

Sharada Sinha: बिहारच्या गानकोकिळा शारदा सिन्हा यांचं निधन! दिल्लीच्या एम्समध्ये घेतला शेवटचा श्वास

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींसाठी मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा, महिन्याला मिळणार 2100 रुपये

Latest Marathi News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

Porsche Car Accident : रक्ताचे नमुने बदलण्यास सांगणाऱ्याचा अटकपूर्व जामीन सर्वोच्च न्यायालयानेही फेटाळला

SCROLL FOR NEXT