Trupti Kolte sakal
पुणे

Trupti Kolte : लोणीकाळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार पदी तृप्ती कोलते

विभाजन होऊन नवीन स्थापन झालेल्या पूर्व हवेलीतील लोणीकाळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार पदी तृप्ती कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

कृष्णकांत कोबल

मांजरी खुर्द - विभाजन होऊन नवीन स्थापन झालेल्या पूर्व हवेलीतील लोणीकाळभोर अप्पर तहसिल कार्यालयाच्या तहसीलदार पदी तृप्ती कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यानिमित्ताने श्रीमती कोलते यांना या अप्पर तहसिल कार्यालयाच्या पहिल्या तहसीलदार होण्याचा मान मिळाला आहे.

राज्य सरकारकडून २ नोव्हेंबरला हवेली तालुका तहसील कार्यालयाचे विभाजन करून पूर्व हवेलीसाठी लोणीकाळभोर येथे अप्पर तहसील कार्यालय स्थापन करणे बाबत निर्णय घेण्यात आला होता. या निर्णयाने अप्पर तहसीलदार व महसूल सहाय्यक पद निर्माण झाले आहे. उपसचिव अजित देशमुख यांनी ३१ जानेवारीला श्रीमती कोलते यांच्या नियुक्तीचे आदेश पारीत केले आहेत.

कोलते यांनी यापूर्वी वेल्हा, वाई, मुळशी येथे नायब तहसीलदार म्हणून तर सोलापूर, पुणे शहर, हवेली येथे तहसीलदार म्हणून काम केले आहे. मुळशी तालुक्यात कार्यरत असताना त्यांनी राज्यातील अभिलेख संगणीकरणाचा पायलट प्रकल्प यशस्वीपणे राबविला. त्यामध्ये चौदा लाख कागदपत्रांचे स्कॅनिंग व संगणीकरण करण्याचे काम झाले. सध्या त्या मुंबई येथील रस्ते विकास महामंडळात तहसीलदार म्हणून कार्यरत होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT