apphu.jpg 
पुणे

मलठण येथे अफूची शेती करणारे दोघे अटकेत

प्रफुल्ल भंडारी

दौंड (पुणे) :  मलठण (ता. दौंड) येथे अर्ध्या एकर क्षेत्रात अफूची शेती करणाऱ्या दोन जणांना अटक करण्यात आली आहे. दोघांकडून सुमारे साडेसात लाख रुपये मूल्य असलेले अफूचं पिक जप्त करण्यात आले आहे, अशी माहिती दौंड पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील महाडीक यांनी दिली. 

दौंड पोलिसांनी २ मार्चला या प्रकरणी संतोष अण्णा ढवळे (वय ४८) व विकास झुंबर ढवळे (वय २७,  दोघे रा. हिंगणीबिर्डी ता. दौंड) या शेतकऱ्याना अटक केली आहे. मलठण येथे अफूची शेती केली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर दुपारी पोलिस उप अधीक्षक सचिन बारी व निरीक्षक सुनील महाडीक यांनी पोलिस पथकासह छापा टाकला. छाप्यात संतोष ढवळे व विकास ढवळे यांच्या शेतात कांदा व हरभऱ्याच्या अंतरपिकात बोंडे आणि फुलोऱ्यात आलेली अफूची पक्व रोपे आढळली. पोलिसांनी सदर रोपे उपटली असता त्यांचे वजन ३८० किलो भरले. तस्कर दोन हजार रूपये किलो या दराने शेतकऱ्याकडून अफू विकत घेतात. शेतकऱ्यांकडून तयार अफू विकत घेऊन त्याची विक्री करणाऱ्या काही तस्करांशी अटकेतील शेतकर्यांचा संपर्क असल्याची माहिती सुनील महाडीक यांनी दिली. 

फौजदार भानुदास जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांविरूध्द अंमली पदार्थ विरोधी कायद्यातील कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अफू व खसखस 
अफू हि पॅपॅव्हेरेसी कुळातील वनस्पती असून तिचे शास्त्रीय नाव पॅपॅव्हर सोम्निफेरम (Papaver Somniferum) असे आहे. अफूच्या कच्च्या फळांना (बोंडांना) चिरा पाडल्यावर त्यातून चिक निघतो आणि हे चिक वाळून घट्ट झाले की अफू हा मादक पदार्थ तयार होते. अफूची  फळे वाळवल्यानंतर त्यापासून खसखस हा मसाल्याचा पदार्थ दाण्यांच्या रूपात मिळतो. मात्र अफूचा मादकपणा खशखशीमध्ये नसतो. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvind Kejriwa: केजरीवालांना मोठा धक्का! दिल्ली सरकारच्या मंत्र्याने दिला राजीनामा; भाजपचं नाव घेत पक्षावर आरोप

बापाच्या जिवावर कॉन्‍ट्रॅक्‍टर झालेल्या नारळफोड्याने माझ्यासमोर उभं राहून दाखवावं; आमदार गोरेंचा कोणाला इशारा?

बाप'माणूस! सरकारी रुग्णालयातील अग्निकांडात याकूबने परक्यांच्या बाळांना वाचवले, मात्र आपल्या जुळ्या मुली गमावल्या...

Chh. Sambhajinagar Crime : नऊ तोळे सोने मोडले दुसऱ्याच्या नावाने, यशस्विनी पतसंस्थेच्या घोटाळ्याची न्यायालयात माहिती

'Rishabh Pant ला हॉस्पिटलमध्ये पाहिलं तेव्हा वाटलं परत क्रिकेट...', रवी शास्त्रींनी सांगितली आठवण

SCROLL FOR NEXT