Two arrested in Nanded Fata murder case from Ranjangaon 
पुणे

पुणे : नांदेड फाटा येथील खुन प्रकरणातील दोघांना रांजणगाव येथून अटक

पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई; आरोपींकडून गुन्ह्याची कबुली

निलेश बोरुडे

किरकटवाडी : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाट्याजवळ भरदिवसा घडलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील दोन फरार आरोपींना अटक करण्यात पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. अमोल अर्जुन शेलार (वय 19, रा. पोकळे वस्ती, धायरेश्वर मंदिराजवळ, धायरी) व अभिजित राम गंगणे (वय 20, रा. जनता वसाहत, गल्ली नं. 42, पर्वती,पुणे-9) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.

23 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास नांदेड फाट्यापासून नांदेड गावाकडे जाणाऱ्या वर्दळीच्या रस्त्याला लागून असलेल्या बालाजी स्क्रॅप सेंटर या दुकानात बसलेल्या मारुती लक्ष्मण ढेबे (वय 20) याची एका कारमधून आलेल्या सहा ते सात हल्लेखोरांनी कोयत्याने वार करुन हत्या केली होती. त्यानंतर सर्व हल्लेखोर पसार झाले होते. ही सर्व घटना रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या दुकानातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. सीसीटीव्ही फुटेज व प्रत्यक्षदर्शी यांच्या मदतीने पोलीसांना सर्व आरोपींची नावे निष्पन्न करण्यात त्याच दिवशी यश आले होते.

भरदिवसा खुन झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. याची गंभीर दखल घेऊन आरोपींना तातडीने अटक करण्याच्या सूचना पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी हवेली पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यानुसार पोलीसांची पथके आरोपींचा शोध घेत होती. या प्रकरणातील दोन आरोपी रांजणगाव गणपती येथील पुणे-नगर रस्त्याला लागून असलेल्या एका लॉजमध्ये असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस नाईक अमोल शेडगे यांना मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अमोल गोरे, रामेश्वर धोंडगे, पोलीस हवालदार राजू मोमिन, अजित भुजबळ, पोलीस नाईक मंगेश थिगळे,अमोल शेडगे व महिला पोलीस कॉन्स्टेबल पूनम गुंड यांच्या पथकाने दोन आरोपींना झोपेत असताना आज दि 26 मार्च रोजी पहाटेच्या सुमारास ताब्यात घेतले. त्यांना पुढील तपासासाठी हवेली पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक निरंजन रणवरे हे अधिक तपास करत आहेत.

खुन झालेलाही होता सराईत गुन्हेगार...

खुन झालेला मारुती ढेबे हाही सराईत गुन्हेगार होता. मागील वर्षी नांदेड गावातील एका तरुणावर त्याने व त्याच्या काही साथीदारांनी तलवार व कोयत्यांनी जीवघेणा हल्ला केला होता. त्यातून तो तरुण थोडक्यात बचावला होता. मयत मारुती ढेबे याच्यावर हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न, दहशत पसरवणे, मारहाण करणे असे गंभीर गुन्हे दाखल आहेत.

अवैध धंद्याच्या वादातून खून?...

मारुती ढेबे याचा खुन अवैध धंद्याच्या वादातून झाल्याचे बोलले जात आहे. ढेबे याने खुन होण्याच्या दोन ते तीन दिवस अगोदर आरोपींपैकी एकाच्या अवैध दारू धंद्यावर जाऊन तोडफोड केली होती. तसेच काही दिवसांपूर्वी एका आरोपीच्या डोळ्यात मागून जाऊन मिरची पूड टाकून हल्ला करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाही राग आरोपींच्या मनात होता.

अवैध धंदे आणि नशेच्या आहारी गेलेली तरुणाई हे गुन्ह्यांचे मूळ...

हवेली पोलीस ठाण्याच्या हद्दीत खून, खुनाचा प्रयत्न, कोयते/तलवारी मिरवत दहशत निर्माण करणे अशा घटना अनेक वेळा घडल्या आहेत. यामध्ये 16 ते 25 या वयोगटातील तरुण गुन्हेगारांचा सहभाग असल्याचे दिसून येत आहे. याचे मुख्य कारण मोठ्या प्रमाणात असलेले अवैध धंदे व नशेच्या आहारी गेलेली तरुणाई हेच असल्याचे दिसते. पोलीसांकडून गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी कठोर कारवाई होत नसल्याने या घटना दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत.

बातमी आल्याने कारवाई केली!..

पेपरमध्ये बातमी आल्याने आम्हाला कारवाई करावी लागते असे पोलीस उघडपणे अवैध धंदे करणाऱ्यांना सांगून त्यांना एक प्रकारे पाठीशी घालण्याचा प्रयत्न करतात. तसेच अवैध धंदे करणाऱ्यांना भडकावून देण्याचाही प्रयत्न पोलीसांकडून होताना दिसतो. परिणामी सर्वसामान्य नागरिक अवैध धंद्यांच्या विरोधात बोलायला घाबरतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: भाजपचे चंद्रकांत पाटील 5,700 मतांनी आघाडीवर

Kolhapur Crime : निकालाच्या दिवशी कोल्हापुरात गोळीबाराची घटना, काय घडलं नेमकं?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: बेलापुरमधून मंदा म्हात्रे आघाडीवर

Maharashtra Assembly Election Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election 2024: मतमोजणी सुरु होताच नाशिक, जळगावमध्ये अदानी ग्रुपचं खासगी विमान दाखल; नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT