पुणे

पुण्यात बसथांबा कोसळला; तीन प्रवासी जखमी

मोहिनी मोहिते

पुणे : कॅम्प भागातील मोलेदिना रस्त्यावरील पीएमपीएमएलचा बसथांबा कोसळून तीन जण जखमी झाले असून दरम्यान, लष्कर पोलिसांनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन जखमींना ससून रुग्णालयात वेळीच उपचारासाठी दाखल केले. ही घटना आज(ता.17) दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास घडली. याबाबत अधिक तपास सुरु असल्याची माहिती लष्कर पोलीस निरीक्षक प्रल्हाद डोंगळे यांनी दिली. (Pune News in Marathi)

दरम्यान, शिवसेनेचे उपशाखा प्रमुख देवेंद्र शिंदे (वय 52, रा.एन आय बी एम कोंढवा) हे अपघातात गंभीर या जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दोन वर्षांपूर्वी लाल देऊळाजवळ देखील अशाच पद्धतीने बसथांबा कोसळल्याची घटना घडली होती. ''जुने बस स्थानक कुजलेले व खराब होऊन मोडकळीस आल्याने कोसळण्याच्या धोका वाढला असून पीएमपीएमएलने अशा थांब्याची दुरुस्ती करावी'' अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

यावेळी पुणे स्टेशन डेपो मॅनेजर संजय कुसाळकर यांनी सांगितले की, ''सध्या घटनास्थळी पाहणी केली आहे. हे बस्थानक महापालिकेने सुमारे 15 वर्षांपूर्वी बसविले होते. ठेकेदाराचे नाव समजू शकले नसून सध्या तो थांबा जीर्ण अवस्थेत होता''

''पुणे महानरपालिकेच्या पुणे कॅम्प भागातील अनेक बसथांब्याची आज अशीच दुरवस्था झालेली आहे, त्यामुळेच आज ही दुर्घटना घडली आहे. देखभाल दुरूस्ती करण्याची जवाबदारी पुणे महानरपालिकेच्या अधिकारी वर्गाची आहे, हीच का स्मार्ट सिटी? पुणेकरांना जीव मुठीत धरून बस थांब्यावर उभे राहावे लागते आहे. जे जे गार्डन आणि बॉम्बे गॅरेज बस थांब्यावर तर गांजा पिणाऱ्यांचा अड्डा झाला आहे. असे बस थांबे हे प्रवाशांच्या सेवेसाठी नसून नशा करणाऱ्यांच्या सेवेसाठी उभारले आहेत काय? बस थांब्यावर मोठ्या मोठ्या जाहिराती लावून पुणेकरांचे जीव वाचणार आहेत का ? हाच मोठा प्रश्न आहे'' अशी भावना पुणे कँटोन्मेंट विधानसभा मतदार संघाचे शिवसेना विभाग प्रमुख अतुल गोंदकर यांनी यावेळी व्यक्त केली.

''पुणे कॅम्प भागातील मोलेदिना रस्त्यावरील पीएमपीएमएलचा बसथांबा आज अचानकपणे कोसळला, यामध्ये एक प्रवासीही जखमी झाला. पीएमपीएमएल प्रशासनाने पावसाळ्यामध्ये बसथांब्याचे स्ट्रक्चरल ऑडीट करणे गरजेचे आहे, नाहीतर सामान्य प्रवाशांना जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागेल'' असे मत कर्तव्य फाउंडेशनचे अध्यक्ष विकास भांबुरे यांनी व्यक्त केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: निकालाचे कौल मानण्यास संजय राऊतांचा नकार

Maharashtra Assembly Election 2024 : शिवसेना अन् राष्ट्रवादी नक्की कुणाची? निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षानंतर आता जनतेचा फैसला

Election Results 2024: खरी राष्ट्रवादी कुणाची आज महाराष्ट्र ठरवणार! आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार शरद कोण आघाडीवर?

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: मनसेला बसणार धक्का? एकमेव आमदार राजू पाटील पिछाडीवर

Shiv Sena Shinde Vs Thackeray: गद्दारीचा आरोप झालेल्या शिंदे सेनेला मतदारांची साथ! ठाकरेंची सेना पिछाडीवर; जाणून घ्या आकडेवारी

SCROLL FOR NEXT