mulshi sakal media
पुणे

चिमुकले विचारताहेत मम्मी-पप्पा केव्हा येणार?

गोरख माझिरे

कोळवण : मम्मी-पप्पा काल कामाला गेले परंतू अजूनही ते घरी का आले नाहीत.. असा प्रश्न पाच वर्षीय आर्यन व सहा वर्षीय संस्कृती आपल्या काका व आजोबांना सारखा विचारत आहेत.. परंतू यावर चिमुकल्यांना काय उत्तर द्यावे हे त्यांना समजतच नाहीये. कारण आई सुनीता या मुळशीतील उरवडे येथील कंपनीला लागलेल्या आगीत मृत झाल्या आहेत, तर या चिमुकल्यांचे वडील राहुल मृत झालेल्या पत्नीची ओळख पटवण्यासाठी दवाखान्यात गेले होते...

उरवडे येथील दुर्घटनेनंतर निसर्गरम्य डोंगराच्या कुशीत वसलेल्या भालगुडी (ता. मुळशी) गावावर शोककळा पसरली. या कंपनीमध्ये भालगुडीतील सहा जण तीन दुचाकीवर दररोज जात. या सहा जणांपैकी सुनीता राहुल साठे (वय २८), अतुल बाळू साठे (वय २२) हे दोघे मृत झाले. संतोष सीताराम साठे (वय २४), आदिनाथ महिपती साठे (वय २१) हे गंभीर जखमी असून, पुण्यातील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत. राहुल सीताराम साठे (वय ३०), सचिन भरत साठे (वय २४) हे दोघे बचावले. मयत सुनीता राहुल साठे यांचे पती राहुल सीताराम साठे यांनी सुनीता यांना वाचवण्याचे प्रयत्न केले, परंतू आगीच्या झळा तीव्र असल्याने सुनीता यांना ते वाचवू शकले नाहीत. तर राहुल यांचा सख्खा भाऊ संतोषही यात जबर जखमी झाला. तर आदिनाथ हा कंपनीच्या बाथरूममध्ये अडकून पडला होता, त्याला सचिन यांने प्रसंगावधान राखून बाहेर काढल्याने आदिनाथ जखमी होऊन यातुन बचावला. या घटनेमुळे गावातील नागरिक दुःखी झाले असून, गावात भयाण शांतता पसरली आहे.

मृत झालेल्या सुनीता यांना संस्कृती (वय ६) व आर्यन (वय ५) ही दोन लहान मुलं आहेत. अज्ञान असल्याने मम्मी-पप्पा कुठे गेले? घरातील आजोबा, काकु, काका यांच्या डोळ्यात पाणी का आहे? आपले पाहुने घरी येऊन रडत का आहेत? असे प्रश्न त्यांना पडत आहेत. आईच्या नसन्याने ते कासावीस झाले आहेत. तर घरातील लग्नाला आलेला तरुण मुलगा अतुल हा मृत झाल्याने आई-वडील, भाऊ-बहीण, आजी रडून कासावीस झाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shah-Yogi Maharashtra Rally : शहा अन् योगी महाराष्ट्रासाठी जीवाचं रान करणार! कोल्हापुरात मुक्काम, दुसऱ्या दिवशी चार सभा

Patan Assembly Election : मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे महाविकास आघाडीच्या नेत्यांना खुले आव्हान, ते म्हणाले...

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Latest Marathi News Updates live : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अंबाबाईचे दर्शन घेऊन सभेला करणार सुरुवात

SCROLL FOR NEXT