Pune Crime sakal
पुणे

Pune Crime : विमाननगरमधील दोन पब सील

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी : राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडवर आला असून, अल्पवयीन युवकांना दारू देणाऱ्या बारला गुरुवारी विमाननगरमध्ये सील ठोकले, तर दुसऱ्या एका बारला नियमभंग केल्याप्रकरणी नोटीस दिली. सलग दुसऱ्या दिवशी नगर रस्ता भागात कारवाई करण्यात आली.

विमाननगरमध्ये २६ अधिकृत बार आहेत, तर तीन दारूची दुकाने आहेत. पंचवीस वर्षांखालील अल्पवयीन युवकांना दारू देणाऱ्या बारवर कारवाई करण्याचा आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यानंतर उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी दोन दिवस बारची कसून तपासणी सुरू केली आहे. विमाननगरमध्ये रात्रभर हवी ती दारू विकत मिळते.

- सनी निकाळजे, विमाननगर

सकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंना दारूच्या बाटल्या नजरेस पडतात.

- शीला देशमुख, विमाननगर

विमाननगर भागात रात्रभर दारू विक्री होते, हा प्रकार पूर्ण थांबला असून, पुन्हा असे आढळल्यास कठोर कारवाई करू.

- अभय औटी, निरीक्षक,

राज्य उत्पादन शुल्क विभाग

कारवाई झालेले पब

ग्रँड अँड बार : या बारमध्ये पंचवीसपेक्षा कमी वयाचा युवक दारू पिताना आढळल्यामुळे उत्पादन शुल्क विभागाने हा बार सील केला आणि परवाना रद्द केला.

मोगल कॅफे : या कॅफेमध्ये परवाना कक्षामध्ये दारू पिणाऱ्या व्यक्तीकडे परमिट नसल्यामुळे नियमभंग झाला म्हणून त्या बारला नोटीस देण्यात आली आहे. विमाननगर आणि कल्याणीनगर भागात काल महापालिकेनेही रूफटॉप हॉटेलवर कारवाई केली होती.

दलालांकडून रात्रभर दारू विक्री

  • विमाननगर भागात असलेली दारू दुकाने रात्री साडेदहा वाजता बंद झाल्यानंतर काही दलाल दुकानाबाहेर थांबतात.

  • ग्राहक आल्यानंतर हवी ती दारू त्यांना चढ्या दराने विकतात.

  • रात्रभर हवी ती दारू उपलब्ध होत असल्यामुळे आसपासच्या परिसरातील मद्यपी विमाननगर भागात येऊन दारू खरेदी करतात.

  • अनेक मद्यपी चारचाकी आणि रिक्षात बसून दारू पिताना नागरिकांना नजरेस पडतात.

  • त्यातून रस्त्यावर जाणाऱ्या महिला आणि ज्येष्ठ नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले आहे.

  • रस्त्यावर थांबून शिवीगाळ करणे, मारामारी करणे यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न

  • विमाननगर भागातील अंधाराचा फायदा घेऊन अनेक अंडाभुर्जी आणि मांसाहारी खाद्यपदार्थ विकणाऱ्या हातगाड्या रात्रभर सुरू

  • मद्यपी दारूच्या बाटल्या रस्त्यावर फोडतात आणि फेकतात.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sakal Podcast : तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! ते राज्यात तिसरी आघाडी जाहीर

RG Kar Doctors Strike Down : कोलकात्यातील डॉक्टरांचा संप अखेर मागे! तरीही आरजी कर कॉलेजच्या डॉक्टरांनी सरकारला दिला इशारा

IND vs BAN: विराट कोहलीने सर्वांसमोर कुलदीप यादवला मैदानात खेचत नेलं, ऋषभ पंतनेही दिली साथ, पाहा Video

Donald Trump Third Attack: ट्रम्प यांच्यावर पुन्हा जीवघेणा हल्ला? अॅरिझोना इथल्या निवडणूक रॅलीत नेमकं काय घडलं?

Tirupati Laddu Controversy: तिरुपती देवस्थानच्या लाडूमध्ये चरबीच! NDDB CALF लॅबच्या रिपोर्टने खळबळ; विनोद तावडेंनीही केलं ट्वीट

SCROLL FOR NEXT