लोणावळा : पुणे-मुंबई 'एक्सप्रेस वे'वर दोन ठिकाणी गाड्यांना आग लागल्याच्या घटना घडल्या. खोपली नजीक टँकर खड्यात उलटल्याने आग लागली तर, कंटेनरच्या इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने आग लागली होती. दोन्ही घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.
अन् भर रस्त्यात मर्सिडीज कार आगीत जळून खाक
गुरुवारी (ता.१९) सकाळी साडेसहा खोपोली नजीक ढेकू गावच्या हद्दीत तीव्र उतारावर रसायनाने भरलेला टँकर खड्यात उलटल्याने लागलेल्या आगीत टँकर जळून खाक झाला. सुदैवाने चालकाने वेळीच बाहेर उडी घेतल्याने चालक बचावला. टँकरच्या चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. घटनेनंतर रस्त्यावर आग आणि धुराचे लोट उठल्याने परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. घटनेची माहिती समजताच 'एक्सप्रेस वे'वरील देवदूत, डेल्टाफोर्स, बोरघाट पोलिस मदत केंद्र, महामार्ग पोलिस घटनास्थळाकडे धाव घेतली. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळावर दाखल झाल्या. 'एक्सप्रेस वे'वरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
रशियन वैमानिकांनी पुण्यात उडविले सुखोई 30
दुसऱ्या घटनेत'एक्सप्रेस वे'वर अमृतांजन पुलाजवळ बुधवारी मध्यरात्री साडे अकरा वाजण्याच्या सुमारास कंटेनरच्या ( एमएच-४६ ओआर ५१३५) इंजिनमध्ये शॉर्टसर्किट झाल्याने कंटेनरच्या केबिनमध्ये आग लागली. चालकाने प्रसंगावधान राखत कंटेनर रस्त्याच्या बाजूला उभा केला. अपघाताची माहिती मिळताच लोणावळा शहर पोलिस व रस्ते विकास महामंडळाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. सदरची आग शमविल्यानंतर अपघातग्रस्त वाहन बाजूला करण्यात आले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.