Adv Avinash Rahne passes away sakal
पुणे

Pune : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक ॲड.अविनाश राहणे काळाच्या पडद्याआड, अंत्यविधीला मोठा जनसमुदाय: मंचर शहर बंद

डी. के वळसे पाटील

मंचर : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे जिल्हा संघटक व मंचर (ता.आंबेगाव) येथील अँड. अविनाश तुकाराम रहाणे (वय ५७) यांचे रविवारी (ता.८) भोसरी येथील खासगी रुग्णालयात उपचारा दरम्यान निधन झाले. मंचर शहरातील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. त्यांच्यामागे आई, तीन बहिणी, पत्नी, मुलगा, मुलगी, सुन, नात असा परिवार आहे.

शिरूर लोकसभा मतदार संघात शिवसेना गावोगावी पोहचविण्याचे व संघटना बांधण्याचे काम त्यांनी गेली ४० वर्षापासून केले आहे. मंचर शाखाप्रमुख, तालुका प्रमुख, जिल्हा प्रमुख व जिल्हा संपर्कप्रमुख या पदावर त्यांनी काम केले आहे. शिवसेना पक्षप्रमुख (स्व) बाळासाहेब ठाकरे व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे विश्वासू सहकारी अशी त्यांची ओळख होती. शिवकल्याण नागरी सहकारी पतसंस्थेचे ते संस्थापक होते. साप्ताहिक बोभाटाचे संस्थापक व संपादक म्हणून ही त्यांनी काही वर्ष काम केले.

१९९९ व सन २०१४ मध्ये आंबेगाव विधानसभा मतदार संघातून शिवसेना पक्षाकडून सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या विरोधात त्यांनी निवडणुक लढविली होती. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या लोकसभेच्या चारही निवडणुकांमध्ये अँड.रहाणे प्रचार प्रमुख होते. २००४ मध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात व मनसेमध्ये प्रवेश केला होता. पण वैचारिक भूमिका न पटल्याने ते पुन्हा स्वगृही शिवसेनेत आले.

मध्यंतरी प्रकृतीमुळे काही काळ राजकीय कार्यक्रमापासून ते अलिप्त राहिले होते. पण शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर त्यांनी उद्धव ठाकरे शिवसेना पक्षाला साथ देवून पक्ष बांधणीचे काम सुरु केले होते. आज भोसरी येथे उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे साडू सुनील बाणखेले, मित्र अभियंता दिलीप मेदगे , राजाराम बाणखेलेयांनी त्यांचा पार्थिवदेह मंचर येथे आणण्याची व्यवस्था केली. फुलांनी सजवलेला रथातून त्यांची अंत्ययात्रा मंचर शहरातून काढण्यात आली. यावेळी सामान्य नागरिक हळहळ व्यक्त करत होते.

राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले, अंत्यविधी प्रसंगी मोठा जनसमुदाय उपस्थित होता. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार बाळासाहेब दांगट, राम गावडे, अँड. जयश्री पलांडे, मच्छिंद्र खराडे, राजाराम बाणखेले, वसंतराव बाणखेले आदींनी श्रद्धांजलीद्व्रारे भावना व्यक्त केल्या. यमुनाबाई रहाणे ह्या त्यांच्या आई व अभियंता गंधार रहाणे हे त्यांचे पुत्र होत.

- ॲड.अविनाश तुकाराम रहाणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

INDWvsSLW : भारताची ‘नारी शक्ती’! श्रीलंकेला पराभूत केले; पाकिस्तान, न्यूझीलंडला धक्के बसले, Semi चे गणित मजेशीर झाले

IND vs BAN: भारताकडून दिल्लीतही बांगलादेश चीतपट! कर्णधार सूर्यकुमारच्या टीमने मालिकाही घातली खिशात

‘MPSC’कडून संयुक्त पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर! 5 जानेवारी व 2 फेब्रुवारीला ‘या’ परीक्षा; 1813 पदांची होणार भरती

Record तोड खेळी! नितीश रेड्डी-रिंकू सिंगची जमली जोडी; लोकेश राहुल-MS Dhoni चा मोडला विक्रम

Latest Maharashtra News Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT