Umesh Chavan statement Enact Patient Rights Act for free treatment pune  
पुणे

मोफत उपचारासाठी रुग्ण हक्क कायदा करा; उमेश चव्हाण

कायद्याच्या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषदेतर्फे आंदोलन

सकाळ वृत्तसेवा

पुणे : शिक्षण हक्क, माहिती अधिकार कायद्याच्या धर्तीवर सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य सेवा ही मोफत व हक्काची मिळाली पाहिजे. यासाठी राज्य सरकारने नागरिकांना मोफत उपचाराचा हक्क देणारा रुग्ण हक्क संरक्षण कायदा त्वरित करावा. अन्यथा या मागणीसाठी रुग्ण हक्क परिषद राज्यभर तीव्र आंदोलन करेल, असा इशारा रुग्ण हक्क परिषदेचे संस्थापक अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी शनिवारी (ता.२२) दिला. या प्रमुख मागणीसह विविध मागण्यांसाठी पुणे शहर रुग्ण हक्क परिषदेच्यावतीने शनिवारी टिळक चौकात (अलका टॉकीज) आंदोलन करण्यात आले.

अध्यक्ष उमेश चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात अजय भालशंकर, पुणे शहर अध्यक्ष अपर्णा साठे, संजय कुरकुटे, श्रीनिवास कुलकर्णी, शिवाजी रणदिवे, विजय लांडे, दीपक खेडकर, यशवंत भोसले, बाळासाहेब ननावरे, सिद्धार्थ ओव्हाळ, नरहरी भोसले, हनुमंत फडके, यल्लप्पा वलदोर, आशा खतीब, रिपब्लिकन युवा मोर्चाचे राहुल डंबाळे, लहूजी समता परिषदेचे अध्यक्ष अनिल हातागळे, प्रहार जनशक्ती पक्षाचे नयन पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेसचे धनंजय टिंगरे आदींसह शहरातील नागरिक, महिला आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यावेळी रुग्ण हक्क संरक्षण कायदा झालाच पाहिजे, रुग्णांना न्याय मिळालाच पाहिजे, मोफत उपचार आमच्या हक्काचे, नाही कुणाच्या बापाचे अशा घोषणा देण्यात आल्या. सध्या नागरिकांना मोफत उपचार मिळवण्यापासून मज्जाव करणे, रुग्णांना सरकारी (शासकीय) निधी मिळविण्यापासून अडवणूक करणे, उपचाराचे देयक (बिल) भरण्यासाठी पैसे नसणाऱ्या रुग्णांची डिस्चार्ज जाहीर झाल्यावरही चार-चार दिवस अडवणूक करणे, रुग्णांना डांबून ठेवणे, रुग्णांचा प्रचंड अपमान करणे अशा बाबी सर्रास घडत असल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मावळ विधानसभा मतदारसंघातून सुनील शेळके यांना ९९७० मतांची आघाडी

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: आदित्य ठाकरे आघाडीवर

नुकतीच पार पडलेली ब्राइड टू बी पार्टी; आता बॅचलर पार्टीसाठी थायलंडला पोहोचली मराठी अभिनेत्री; पाहा झक्कास फोटो

Winter Diet: आहारात 'या' 5 पदार्थांचा करा समावेश, हिवाळ्यात राहाल निरोगी

Assembly Election 2024 Result : चर्चांना उधाण! विधानसभेचे एक्झिट पोल खरे ठरणार का? ठिकठिकाणी उमेदवारांच्या विजयाचे ‘बॅनर वॉर’

SCROLL FOR NEXT