baramati sakal
पुणे

उंडवडी परिसरात गाईला लम्पी स्किन ; आयुक्तांकडून गाईची पाहणी

पशुसंवर्धन विभागाने परिसरातील गावात लम्पी स्किन प्रतिबंधक लसीकरण हाती घेतली आहे.

विजय मोरे ः सकाळ वृत्तसेवा

उंडवडी : उंडवडी सुपे येथे एका शेतकऱ्याच्या गाईला लम्पी स्किन आजाराचा प्रादुर्भाव झाला आहे. या गाईची राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह यांनी भेट देवून पाहणी केली. यावेळी पशुधन अधिकाऱ्यांकडून लम्पी स्किन आजार व परिसरात सुरु असलेल्या लसीकरणाबाबत माहिती जाणून घेतली व उपचार व लसीकरणाबाबत पशुधन अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. तसेच लम्पी आजार व मूरघास चारा या बाबत शेतकऱ्यांशीही सविस्तर चर्चा केली.

उंडवडी सुपे ( ता. बारामती) येथील पशुसंवर्धन दवाखान्याच्या कार्यक्षेत्रातील दोन गावात दोन जनावरांना लम्पी स्किन या आजाराचा प्रादुर्भाव झाल्याचे आढळून आले आहे.यामध्ये उंडवडी सुपे येथील एका शेतकऱ्याची गाई व उंडवडी कडेपठार येथील एक गाभण कालवडीला प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे पशुसंवर्धन विभागाने परिसरातील गावात लम्पी स्किन प्रतिबंधक लसीकरण हाती घेतली आहे. आत्तापर्यंत तीन गावातील शेतकऱ्यांच्या 3100 जनावरांना लसीकरण पूर्ण केले आहे.

गेल्या चार - पाच दिवसापूर्वी उंडवडी कडेपठार हद्दीतील बोपळबेट येथील एका शेतकऱ्यांच्या दोन वर्षे वय असलेल्या गाभण कालवडीला लम्पी स्किन या आजाराची लक्षणे आढळून आली होती. त्यानुसार उंडवडी सुपे येथील पशुधन अधिकारी डॉ. पी. बी होळकर यांनी रक्ताचे नमुने तपासणीला दिले होते. तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

त्यामुळे पशुसंवर्धन विभागाच्या वतीने संबंधित आजाराचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तातडीने उंडवडी क. प , सोनवडी सुपे व जराडवाडी या गावात जनावरांना लम्पी स्किन प्रतिबंधक लसीकरण मोहिम सुरु केली आहे. लसीकरण मोहिमेसाठी तीन टीम करण्यात आल्या आहेत. संबंधित गावात शेतकऱ्याच्या घरी जावून लस देण्याचे काम वेगात सुरु असून यामध्ये उंडवडी सुपे पशुसंवर्धन दवाखान्याचे पशुधन पर्यवेक्षक पी. बी होळकर, परिचर महेश गायकवाड, पशुधन विकास अधिकारी दिपक पवार, परिचर बाळासाहेब चव्हाण, डी. आर. पोळ, अनिल शिंदे या मोहिमेत सहभागी आहेत. लसीकरण मोहिमेत आत्तापर्यंत 3100 जनावरांना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

उंडवडी सुपे येथील पशुसंवर्धन दवाखान्याच्या कार्यक्षेत्रात उंडवडी सुपे, उंडवडी कडेपठार , सोनवडी सुपे, जराडवाडी, कारखेल व खराडेवाडी ही सहा गावे असून 6500 एवढे पशुधन आहे. 3400 जनावरांचे लसीकरण राहिलेले असून लस उपलब्ध होईल. त्यानुसार उर्वरित गावातही लसीकरण मोहिम राबविण्यात येणार आहे. अशी माहिती पशुधन पर्यवेक्षक डॉ. पी. बी. होळकर यांनी दिली.

उंडवडी सुपे येथील लम्पी स्किन या आजाराचा प्रादुर्भाव झालेल्या गाईची पाहणी करताना राज्याचे पशुसंवर्धन आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह व पशुधन अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT