पुणे : महाराष्ट्रात सहकार क्षेत्राची मोठी ताकद आहे. महाराष्ट्रातून देशभरात सहकार क्षेत्र पोहोचण्यास मदत झाली असून देशातील सहकारात महाराष्ट्र आघाडीवर आहे. पुढील दशकात सहकारिता क्षेत्र मोलाची भूमिका बजावेल, असं प्रतिपादन केंद्रीय सहकारमंत्री अमित शहा यांनी केला. ते सकाळ समूहाच्या वतीने पुण्यात आयोजित सहकार महापरिषद बोलत होते.
श्रीराम पवार बाबींवर लक्ष केंद्रीत केल असून लेखी निवेदन दिलं आहे. सहकार क्षेत्राच्या प्रश्नांसाठी जेवढं काही करता येईल ते मोदी सरकार नक्की करणार आहे. सहकार क्षेत्रात काही निवडक राज्य चांगलं काम करत आहेत. त्यात महाराष्ट्र आहे. राजर्षि छत्रपती शाहू महाराजांनी सहकार बँकांची सुरुवात केली. त्याआधीपासूनच महाराष्ट्राचा स्वभाव सहकाराचा राहिला आहे.
विठ्ठलराव विखे पाटील, धनंजय गाडगीळ, वैकुंठ मेहता आणि अमुलचे संस्थापक यांचं सहकारात मोठं योगादन आहे. ते जुन्या मुंबई राज्याशी निगडीत होते. या इथूनच सहकार क्षेत्र हे एक आंदोलन बनलं. तळागाळापर्यंत सहकार क्षेत्र पोहचविण्यात महाराष्ट्राचं मोठं योगदान असल्याचं अमित शहा यांनी म्हटलं.
मी सहकार क्षेत्रात ३० वर्षांपासून काम करतो. अनेकांची मागणी होती की, सहकार क्षेत्र कृषीमंत्रालयापासून वेगळं असावं. त्यानंतर मोदी सरकारने याबाबत निर्णय घेतला आणि सहकारमंत्री होण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो, असंही शहा यांनी नमूद केलं.
शहा म्हणाले की, सहकार हा मुख्यत्वे राज्याचा विषय. आज सहकाराची चर्चा होते तेव्हा त्यात काय होणार असा प्रश्न विचारला जातो. मात्र २१ टक्के साखर सहकारी संस्थांमधून निर्मित होते. दूध-गहू सहकारातून खरेदी होते. धान्याची खरेदी सहकारी संस्थांकडून होते. ग्रामीण अर्थकारणाला सहकार चालना देते आणि मोठे करते. अनेकांना वाटतं की, सहकार क्षेत्र बिनकामाचं होतंय, असं म्हणणाऱ्यांना मी सांगू इच्छितो की तसं कधीच होणार नाही. याउलट पुढील दशकात सहकारिता क्षेत्र मोलाची भूमिका निभावणार असल्याचं ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.