Manoj Pawar Sakal
पुणे

वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना केंद्रीय गृहमंत्री पदक

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तपासासाठी दिला जाणारा २०२२ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पदक वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना जाहीर झाला.

मनोज कुंभार

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तपासासाठी दिला जाणारा २०२२ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पदक वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना जाहीर झाला.

वेल्हे, (पुणे) - केंद्रीय गृह मंत्रालयाकडून तपासासाठी दिला जाणारा २०२२ मधील उत्कृष्ट कामगिरीसाठीचे पदक वेल्हे पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज पवार यांना जाहीर झाला असल्याने तालुक्यामधून त्यांच्यावर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.

पानशेत येथील अडीच वर्षीय अत्याचारीत आदिवासी बालिकेच्या निघृण खुनाच्या गुन्ह्यांचा उत्कृष्टरित्या तपास केल्याबद्दल वेल्हे पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक मनोज पवार यांना केंद्रीय गृहमंत्री पदक जाहीर झाले आहे.

केंद्र सरकारच्या गृह विभागाकडून दरवर्षी गुन्ह्यांचा उत्कृष्ट तपास करणाऱ्या तपासी अधिकाऱ्यांना 'केंद्रीय गृहमंत्री पदक' दरवर्षी दिले जातात. यावर्षी महाराष्ट्रातून ११ पोलीस अधिकाऱ्यांची निवड करण्यात आली असून त्यापैकी वेल्हे पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक मनोज मोहन पवार यांची निवड नक्कीच वेल्हे तालुका तसेच पुणे जिल्ह्यासाठी अभिमानास्पद त्याचे मत व्यक्त करत भोर विधानसभा मतदारसंघाचे आमदार संग्राम थोपटे यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

पानशेत येथील आदिवासी अडीच वर्षीय चिमुकली हरविल्याची तक्रार १५ फेब्रुवारी २०२१ दाखल झाली होती. मुलीचा शोध घेत असताना मुलीचा मृतदेह सापडला होता दरम्यान शवविच्छेदन अहवालात डॉक्टरांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार होऊन ती मयत झाल्याचा अभिप्राय दिला. सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदार यांच्याकडून मिळालेल्या माहितीवरून आरोपीला रायगड जिल्ह्यातील दुर्गम भागात पायपीट करून ४८ तासांत जेरबंद केले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीणचे अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी सदरची केस अति संवेदनशील असून याचा खटला जलद गती न्यायालय चालवण्याची विनंती केली होती.

या गुन्ह्यात आरोपीला २८ फेब्रुवारी २०२२ रोजी फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर आंबवणे येथील पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी सहकारी बँकेमध्ये चोरीची घटना घडली असता यामधील आरोपीला सुद्धा अवघ्या सहा तासात अटक केली होती.

वेल्हे पोलीस स्टेशनच्या इतिहासामध्ये तालुक्यामध्ये पहिल्यांदाच एखाद्या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली गेली असून केंद्रीय गृहमंत्री पदक पहिल्यांदाच वेल्ह्यातील पोलीस स्टेशनचे अधिकारी मनोज मोहन पवार यांच्या रूपाने मिळाले असून तालुक्यातील विविध स्तरांवरून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: भाजपाचे अतुल भातखळकर आघाडीवर

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पोस्टल मतमोजणीत युगेंद्र पवार आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Assembly Elecation Result: महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर...प्लॅन B तयार, दगाफटका टाळण्यासाठी उचलले मोठे पाऊल

Maharashtra Assembly Election Result: निकालाच्या टेन्शननं बीपी वाढलंय? अशी घ्या काळजी

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

SCROLL FOR NEXT