पुणे - ‘तरुणार्इ देशासाठी दिशादर्शक आहे. त्यामुळे समाजात समता निर्माण होर्इल असा प्रवास तरुणांना करावा. त्यातून जातिभेदाच्या श्रृखंला गळून पडतील. त्या दृष्टीने सर्वांनी प्रयत्न केला तर स्वतंत्र सेनानींना अपेक्षित असलेल्या स्वराज्याची स्थापना होर्इल,’ असा विश्वास राज्यपाल भगतसिंग कोशियारी यांनी शुक्रवारी व्यक्त केला.
कोरोना काळात गरजूंना मदतीचा हात देणा-या सेवाव्रती व्यक्ती आणि संस्थांचा राज्यपाल कोशियारी यांच्या हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सत्कार करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त ‘समर्थ युवा फौंडेशन’ने हा सोहळा आयोजित केला होता. त्यात राज्यपाल बोलत होते. भांडारकर प्राच्यविद्या संस्थेच्या सभागृहात हा कार्यक्रम पार पडला.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, खासदार गिरीश बापट, महापौर मुरलीधर मोहोळ, भाजप शहराध्यक्ष जगदीश मुळीक, आमदार माधुरी मिसाळ आणि फाउंडेशनचे संचालक राजेश पांडे यावेळी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणाले, ‘नेतृत्व निष्कलंक असेल तर तीच भावना खाली पाझरते. केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातून असेच नेतृत्व लाभल्याने देशात उत्साहाचे आणि आत्मविश्वासाचे वातावरण आहे. पैसे देवून काम होते ही भावना संपवायला हवी.’’
पाटील म्हणाले, ‘सेवा आणि सर्मपनाच्या भावनेतून हा कार्यक्रम आखला गेला आहे. राज्यपालांच्या उत्साहाबाबत नेहमीच चर्चा होते. मात्र त्यांच्यात सहनशीलता देखील प्रचंड आहे. सी.ए. राज देशमुख यांनी पुरस्कारार्थींचा परिचय करून दिला. सुकुमार देशमुख यांनी आभार मानले.
राज्यपाल हे रबर स्टॅम्प नाहीत :
‘मनाला पटलेले आणि कायदेशीर असेल तेच काम राज्यपाल करतात. राज्यपाल हे रबर स्टॅम्प राज्यपाल नसून ते त्यांच्या सद्सद्विवेक बुद्धीनुसार योग्य निर्णय घेतात,’ असे बापट म्हणाले.
पुरस्कारारार्थी :
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, दलित इंडियन चेंबर आॅफ कॉमर्सचे अध्यक्ष पद्मश्री मिलिंद कांबळे, पुणे फ्लॅटफॉर्म फॉर कोविडचे अध्यक्ष सुधीर मेहता, पुणे श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष मंगेश कोळपकर, इस्कॉनच्या अन्नामृत फाउंडेशनचे संजय भोसले यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती आणि पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य व स्वच्छता विभाग यांचा राज्यपालांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.