Avinash Dharmadhikari sakal
पुणे

Avinash Dharmadhikari : 'यूपीएससी'ने पूजा खेडकरची उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय घेऊन विश्वासार्हता वाढवली

पूजा खेडकर यांना युपीएससीने आणखी एक दणका दिला आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसंच त्यांना यापुढे कोणत्याही सरकारी परीक्षेला बसण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पूजा खेडकर यांना युपीएससीने आणखी एक दणका दिला आहे. त्यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. तसंच त्यांना यापुढे कोणत्याही सरकारी परीक्षेला बसण्यापासून मज्जाव करण्यात आला आहे. आत्ता या प्रकरणावर माजी निवृत्त अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांनी आपलं मत व्यक्त केलं आहे.

ते म्हणाले की, आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्याबाबत यूपीएससी ने जो निर्णय घेतला आहे. त्या निर्णयाने त्यांनी त्यांची विश्वासार्हता वाढवली आहे. त्यांच्याकडून ज्या अपेक्षा होत्या त्या त्यांनी पूर्ण केल्या आहे. अस यावेळी धर्माधिकारी यांनी म्हटलं आहे.

ते पुढे म्हणाले की, या प्रकरणाचा युपीएससीच्या परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी सरसकटीकरण करू नये. युपीएससी आणि एमपीएससी मधून निवडून जाणारी बहुतांश मुले ही अशीच असतात हे समजणं योग्य नाही. निवडून जाणारे विद्यार्थी हे खूप अभ्यास करून पुढे जात असतात. तसेच मुलांनी त्यांच्या मेहनती वरील विश्वास कमी करू नये. अभ्यासाबरोबरच मुलांनी चरित्र देखील सुधारावा अस यावेळी धर्माधिकारी म्हणाले.

आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यावर झालेल्या कारवाईबाबत धर्माधिकारी म्हणाले की, यूपीएससीने पूजाच्या सर्व कागदपत्रांची छाननी करून जाहीर केले की, तिने तरतुदींचा गैरफायदा घेतला. त्यामुळे तिची मूळची जी निवड ही तात्पुरती होती ती निवड रद्द केली आणि पुढे या प्रकारच्या कुठल्याही परीक्षांना बसायला तिला बंदी घातली आहे.

हे प्रकरण म्हणजे सगळ्यांनाच एक धडा आहे. ते म्हणजे अश्या काही तरतुदींच्या कोणी गैरवापर करून घेत नाहीये ना याचा थोडा डोळ्यात तेल घालून अधिक लक्ष द्यावं लागणार आहे. मी वाचलं की यूपीएससीने निवेदनात म्हंटले की त्यांनी 2009 ते 2023 या काळाचे त्यांनी असे 15000 प्रकरणे तपासली आहे. यात एक तरतूद तपासली गेली आहे अश्या ज्या सामाजिक वर्गवारी तसेच विविध प्रमाणपत्राबाबत कोणी गैरफायदा घेत नाही याची देखील पुढील काळात दक्षता घेतली पाहिजे अस यावेळी धर्माधिकारी यांनी सांगितल.

ते पुढे म्हणाले की, यूपीएससीच्या मी त्याला सावध स्वागत अस म्हणेल यूपीएससी सारख्या व्यवस्थित कडून जे अपेक्षा आहे ती याबाबतीत पूर्ण झाली. पण मी या निमित्ताने माझी यूपीएससीला सुद्धा विनंती राहील की, केवळ एका प्रकारावर न थांबतात यूपीएससीने कायद्याच्या भाषेत ज्याला कायद्याच्या भाषेत सुमोटो म्हणतात. ज्यात आपणहून असे काही अन्य घडत नाहीत ना, आणि यापुढेही घडणार नाहीत ना, यासाठी यूपीएससीने पावलं उचलावी अशी माझी सुद्धा यूपीएससीकडे विनंती आहे.अस यावेळी धर्माधिकारी म्हणाले.

विद्यार्थ्यांना आवाहन करत धर्माधिकारी म्हणाले की, एका प्रकारामुळे या परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी हे जर विचलित व्हायला लागले तर उद्या प्रशासनातली आव्हानं ते कसे काय सांभाळणार आहेत. प्रशासनातली रोजची आव्हाने या घडलेल्या प्रकारापुढे काहीच नाहीत अधिकाऱ्याचं उलट काम आहे चित्त शांत ठेवून लोकांच्या तिथे मदतीला धावून जायाला हवं.

एका पूजा खेडकर प्रकरणामुळे समजा कोणी मुलं विचलित व्हायला लागली. तर माझं त्यांना म्हणणे आहे की विचलित होऊ नका, स्वतःची जोपासना चालू ठेवा. इनफॅक्ट परीक्षेत यशस्वी झाला तर पुढे तुम्हाला आणखी मोठी आव्हानं देशाकरता लोकांकरता पेलायच आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Crizac IPO: क्रिझॅक आणणार 1000 कोटींचा आयपीओ, सेबीकडे पेपर्स जमा...

'शाका लाका बूम बूम' मधील संजूची लगीनघाई; किंशुक वैद्यला लागली हळद, 'या' ठिकाणी पार पडणार लग्नसोहळा

Share Market Closing: शेअर बाजारात जोरदार तेजी; सेन्सेक्स-निफ्टी अडीच टक्क्यांनी वाढले, आयटी आणि बँकिंग शेअर्समध्ये तुफान खरेदी

AUS vs IND 1st Test: पहिल्याच दिवशी १७ विकेट्स! भारत-ऑस्ट्रेलियाची फलंदाजी कोलमडली, पण गोलंदाजांनी मैदान गाजवलं

Latest Maharashtra News Updates : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यांनी घेतला शहरी वृक्ष व्यवस्थापन कार्यशाळेत भाग

SCROLL FOR NEXT