IAS_Pankaj_Yadav 
पुणे

UPSC Success story: पहिलं MBBS केलं, नंतर IPS झाला आणि शेवटी IAS

सकाळ डिजिटल टीम

Success Story of IAS Pankaj Yadav: पुणे : ज्यांच्या स्वप्नातच ताकद असते, ती लोकं त्यांची स्वप्न पूर्ण करतातच. उदाहरण पाहायचं झालं तर हरयाणाच्या पंकज यादव यांचं घेता येईल. हरयाणातील रेवाडी जिल्ह्यातील एका छोट्याशा टीट गावात पंकज यांचं शिक्षण झालं तेही सरकारी शाळेत. इतकंच नाही तर त्यांनी एमबीबीएसही रेवाडीमधूनच पूर्ण केलं. 

शैक्षणिक कारकीर्दीत कधीच मोठं यश न मिळालेल्या पंकज यांनी मेहनतीच्या जोरावर यश हे कोणत्याही सेवा-सुविधांवर अवलंबून नसतं हे दाखवून दिलं. ज्याला आयुष्यात खरंच काहीतरी करून दाखवायचं आहे, तो कसाही आपला मार्ग बनवतो आणि ध्येयापर्यंत पोचतोच. पंकजनेही पहिल्यांदा एमबीबीएस केलं. त्यानंतर तो आयपीएस झाला आणि शेवटी आयएएस बनून स्वत:ला सिद्ध केलं. 

यामुळं यूपीएससीची परीक्षा देण्याचा निर्णय घेतला
आपण खेड्यातून आलो आहोत, त्यामुळं शहरातील मुलांसारख्या सेवा-सुविधा आणि संसाधने आपल्याला मिळाली नाहीत, याबाबत पंकज यांना कधीच खंत वाटली नाही. जेव्हा पंकज एमबीबीएस करत होते, त्यावेळी गावातील विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याचा विचार त्यांच्या मनात आला. त्यामुळे तरुणांची मदत केली जाऊ शकते, अशा क्षेत्रात जाण्याचा त्यांनी निर्णय घेतला. त्यावेळीच पंकज यांनी यूपीएससी परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. 

पंकज यांनी तयारीत कसलीही कसर सोडली नाही. पण त्यांना त्यांच्या आवडीची पोस्ट मिळाली ती तिसऱ्या अटेम्प्टमध्ये. पहिल्या अटेम्प्टवेळी ते मुलाखतीपर्यंत पोहोचले पण त्यांची निवड होऊ शकली नाही. २०१८मध्ये दुसरा अटेम्प्ट दिला आणि ते ५८९वी रँकसह आयपीएस झाले. पण त्यांना आयएएस व्हायचं होतं त्यामुळे त्यांनी तिसरा अटेम्प्ट दिला आणि ५६व्या रँकसह ते आयएएस साठी निवडले गेले.

पंकज म्हणतात, 
- उमेदवाराची पार्श्वभूमी त्याच्या यशाचा मार्ग कधीच बनू शकत नाही, त्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. तुमच्याकडं काय नाही याकडं लक्ष देऊ नका. तुमचं स्वप्न काय या एकाच गोष्टीकडे तुमचं लक्ष असलं पाहिजे.

- यासोबतच योग्य मार्गदर्शन मिळवण्याचा प्रयत्न करा. इतर गोष्टींच्या कमतरतेमुळे एखादं काम होऊन जाईल, पण जर योग्य मार्गदर्शन नसेल तर कदाचित ते काम होण्यात बरेच अडथळ्यांचा सामना करावा लागेल. 

- आपल्या अवतीभवती असणारं वातावरण अभ्यासाला पूरक नसेल किंवा कोण मार्ग दाखवणारंही भेटत नसेल, तर नाराज होऊ नका. इंटरनेटची मदत घ्या. इंटरनेटवर प्रत्येक समस्येचा तोडगा सापडेल. 

- इंटरनेटवर परीक्षेच्या पॅटर्नपासून ते मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका आणि टॉपर्सच्या मुलाखतीपर्यंत सर्वकाही पाहू शकता. आणि त्याचा आपल्या गरजेनुसार उपयोग करू शकता. 

- यूपीएससीच्या प्रवासात संयम सर्वात जास्त गरजेचा आहे. कधीकधी यश मिळवण्यासाठी किंवा आपल्या आवडीचं पद मिळवण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे हिंमत हारू नका. धीर सोडू नका. प्रामाणिक प्रयत्न असतील, तर यश हमखास मिळेल.

- एज्युकेशन जॉब्ससंबंधी बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China: चीनमध्ये प्रदर्शित होणार पहिला भारतीय चित्रपट; तमिळच्या रहस्यपटाचा परदेशात डंका

Maharashtra Assembly Election 2024 Result : शिवसेना, राष्ट्रवादीपेक्षा काँग्रेसला अधिक मते; मात्र, त्या तुलनेत काँग्रेसने जागा कमी जिंकल्या

''बिहारमध्ये नितीश कुमारांना भाजपने शब्द दिला होता, पण महाराष्ट्रात तसं काही नाही'' केंद्रातील नेत्याचं विधान

WI vs BAN: वेस्ट इंडिजचा तब्बल २०१ धावांनी विजय अन् WTC पाँइंट्स टेबलमधील अखेर शेवटचं स्थान सोडलं

Chief Minister : आमचाच नेता ‘सीएम’ व्हायला हवा! एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकर्त्यांत रस्सीखेच

SCROLL FOR NEXT