उरुळी कांचन : कत्तल खाण्यात कत्तल करण्यासाठी आठ गाई घेवून जाणारा ट्रक गोरक्षकांनी पकडून उरुळी कांचन पोलिसांच्या ताब्यात दिला. बेकायदा जनावरांची वाहतूक केल्याप्रकरणी पोलिसांनी ट्रक चालकाविरोधात महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
रणजीत बाळू खाडे, (रा. पिंपरी सांडस, ता. हवेली) असे पोलिसांनी गुन्हा दाखल केलेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. याप्रकरणी गोरक्षक राहूल चंद्रकांत बारंगळे (वय - २८ वर्षे, रा. तुपे वस्ती, उरूळी कांचन, ता. हवेली) यांनी फिर्याद दिली आहे.
खाडे हा कत्तलखान्यासाठी ट्रकमधून बेकायदेशीरपणे गायींची वाहतूक करत असल्याची माहिती फिर्यादी बारंगळे यांना मिळाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, बारंगाळे यांनी गोरक्षक सहकारी रोहीत तात्यासो केदारी (रा. कडेठाण, ता. दौंड), आकाश प्रभाकर तुपे, प्रशांत राजेंद्र लोंढे;(दोघेही रा. तुपे वस्ती, उरूळी कांचन, ता. हवेली) मदतीने २८ सप्टेंबर रोजी रात्री पावणे एकच्या सुमारास ऊरूळी कांचन येथील साखरे पेट्रोल पंपाजवळ खाडे चालवत असलेला (MH-१२/WJ-०९३२) ट्रक पकडला.
ट्रकची पाहणी केल्यावर ट्रकमध्ये ८० हजार रुपये किंमतीच्या आठ गाईंची बेकायदेशीरपणे जनावरे रात्रीचे वेळी चारा पाण्याची सोय न करता दोरीने बांधून पुण्याच्या दिशेने नेत असल्याचे निदर्शनास आले. फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांनी ११२ नंबरवर फोन करून पोलिसांना बोलावून घेतले.
गायींचा ट्रक उरुळी कांचन पोलिस ठाण्यात घेवून गेल्यानंतर चालक खाडेकडे चौकशी केल्यानंतर ही जनावरे कत्तल करण्यासाठीच पनवेल नवी मुंबई येथे घेऊन जात असल्याचे समजले. त्यामुळे पोलिसांनी ट्रकचालक खाडे याच्यावर महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला. उरुळी कांचन पोलिस अधिक तपास करत आहेत.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.