Corona Vaccine Google file photo
पुणे

पुणे : आज १११ ठिकाणी लसीकरण; ८० टक्के लस दुसऱ्या डोससाठी राखीव

रविवारी महापालिकेला २५ हजार कोव्हिशील्ड, तर १ हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध झाले आहेत. ही लस पुढील दोन दिवस तरी वापरता आली पाहिजे यादृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे.

सकाळ वृत्तसेवा

रविवारी महापालिकेला २५ हजार कोव्हिशील्ड, तर १ हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध झाले आहेत. ही लस पुढील दोन दिवस तरी वापरता आली पाहिजे यादृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे.

पुणे : पुणे शहरासाठी सरकारकडून लस उपलब्ध झाल्याने गेले दोन दिवस बंद असलेली लसीकरण (Vaccination) मोहीम आजपासून पूर्ववत होत आहे. ४५ ते पुढील वयोगटासाठी शहरात १११ ठिकाणी लसीकरण होणार आहे. १०१ ठिकाणी कोव्हिशील्ड (Covishield), तर १० ठिकाणी कोव्हॅक्सिनची (Covaxin) लस उपलब्ध असेल. यामध्ये ८० टक्के लस दुसऱ्या डोससाठी, तर ऑनलाइन नोंदणी केलेल्यांसाठी २० टक्के लस पहिल्या डोससाठी असेल. (Vaccination will be conducted in 111 places in Pune city for age group of 45 to above)

रविवारी महापालिकेला २५ हजार कोव्हिशील्ड, तर १ हजार कोव्हॅक्सीनचे डोस उपलब्ध झाले आहेत. ही लस पुढील दोन दिवस तरी वापरता आली पाहिजे यादृष्टीने महापालिकेने नियोजन केले आहे. ४५ वयाच्या पुढील गटासाठी महापालिकेच्या शाळा आणि दवाखाने अशा ९७ ठिकाणी कोव्हिशील्डचे प्रत्येकी १०० डोसचे वितरण करण्यात आले आहे. तर एसआरपीएफ-रामटेकडी, पोलिस मुख्यालय शिवाजीनगर, येरवडा कारागृह आणि रेल्वे हॉस्पिटल या चार ठिकाणी देखील प्रत्येकी १०० लसीचे डोस दिलेले आहेत, तर १० केंद्रांवर कोव्हॅक्सीनचे लसीचे प्रत्येकी १०० डोसचे वितरण करण्यात आलेले आहेत.

१८ ते ४४ गटासाठी सहा केंद्र

१८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी सोमवारी (ता.१०) ६ केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन करण्यात आले आहे. यात कमला नेहरू रुग्णालय आणि राजीव गांधी रुग्णालय येथे प्रत्येकी ५०० कोव्हिशील्डचे डोस उपलब्ध आहेत. तर लायगुडे दवाखाना, सुतार दवाखाना, मगर दवाखाना येथे प्रत्येकी ५०० आणि ससून रुग्णालयात २०० डोस उपलब्ध आहेत. या सहा ठिकाणी केवळ ऑनलाइन बुकिंग असणाऱ्या नागरिकांनाच लस दिली जाणार आहे.

४५ प्लस याकडे लक्ष द्यावे

- कोवॅक्सिनचा दुसरा डोस १२ एप्रिल २०२१ पूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना दिला जाईल.

- कोव्हिशील्डचा दुसरा डोस २२ मार्च २०२१ पूर्वी पहिला डोस घेतलेल्यांना दिला जाईल.

- पहिल्या डोससाठी ऑनलाइन नोंदणीनुसार येणाऱ्यांसाठी २० टक्के डोस राखीव असणार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Rathod won in Digras Assembly Election Results 2024: माणिकराव ठाकरेंचा पुन्हा पराभूत, हायव्होल्टेज लढतीत संजय राठोड विजयी

Eknath Shinde : एकनाथ शिंदे महाविकास आघाडीपेक्षा भारी, केलीय आता पुढची तयारी

"त्याने माझ्या तब्येतीची चौकशी केली आणि..." शुटिंगमुळे थकलेल्या सलमानच्या कृतीने भारावली हिना , म्हणाली...

Prakash Solanke won Majalgaon Assembly election 2024 final Result: माजलगावमध्ये अटीतटीच्या लढतीत प्रकाश सोळंके विजयी, शरद पवार गटाच्या उमेदवाराचा पराभव

Ballarpur Assembly Constituency Result 2024 : बल्लारपूरमध्ये भाजपचा गुलाल! सुधीर मुनगंटीवारांनी 105969 मतांनी गड राखला

SCROLL FOR NEXT