तळेगाव दाभाडे - अवघ्या आठवड्यावर येऊन ठेपलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’साठी मावळातील गुलाब सज्ज झाला असून, फुले परदेशांत पाठवली जात आहेत. मात्र परदेशांत मागणी घटल्याने भावही कमी झाले आहेत.
फुलांच्या भावाची प्रतवारी लांबीनुसार ठरते. स्थानिक व जागतिक बाजारपेठेत ५० ते ६० सेंटिमीटरच्या फुलांना अधिक पसंती असते. यंदा मावळातील फुलांना मागणी घटली आहे. जागतिक बाजारपेठेत प्रतवारीनुसार एका फुलाला १३ ते १४ रुपये भाव आहे. मात्र स्थानिक बाजारपेठेत भाव कमी-अधिक होत आहेत. मागील वर्षापेक्षा यंदा एक ते दोन रुपयांनी भाव कमी झाला आहे.
सद्यःस्थिती काय?
यंदा पोषक वातावरणामुळे उत्पादनासह फुलांचा दर्जा उत्तम
औषधांवर होणारा नाहक खर्च झाला कमी
परदेशांत मागणी घटल्याने फूलउत्पादक शेतकऱ्यांना काहीसा फटका
परदेशी बाजारपेठ
जपान, ऑस्ट्रेलिया, हॉलंड, ग्रीस, स्वीडन, युरोप, दुबई आदी.
देशांतर्गत बाजारपेठ
मुंबई, दिल्ली, बंगळूर, कोलकता आदी मोठी शहरे.
गुलाबाचा उत्पादन खर्च वाढला असून, विमानप्रवास महागला आहे. त्यात १८ टक्के जीएसटी आकारला जात असल्यामुळे निर्यातीवर मोठा परिणाम झाला आहे. यामुळे यंदा परदेशांत फुलांची मागणी घटली आहे.
- मुकुंद ठाकर, अध्यक्ष, पवना फूलउत्पादक संघ
चीन अथवा इतर बाजारपेठांमधून येणारी कृत्रिम फुलांची आयात शासनाने बंद केली, तर आपली नैसर्गिक फुले परदेशांत न पाठवता देशांतर्गत बाजारपेठेतच मोठी विक्री होईल. त्यामुळे शासनाने योग्य पावले उचलून शेतकऱ्यांना पाठबळ द्यावे.
- ज्ञानेश्वर ठाकर, शेतकरी
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.