varsha mohite sakal
पुणे

Pune News : वर्षा मोहिते यांचे मृत्यूपश्चात डोळे, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि यकृत केले दान

पुण्यातील नागरिक वर्षा नंदकुमार मोहिते यांचे मेंदुमृत (ब्रेन-डेड) झाल्यानंतर रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात त्यांचे अवयवदान करण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुण्यातील नागरिक वर्षा नंदकुमार मोहिते (वय ५४, रा. कोथरूड, पुणे) मेंदुमृत (ब्रेन-डेड) झाल्यानंतर रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात त्यांचे अवयव दान करण्यात आले. यामुळे गरजू रुग्णांस वेळेत अवयव मिळाल्याने जीवदान मिळाले.

वर्षा मोहिते यांना २० सप्टेंबर रोजी उपचारासाठी रुबी हॉल क्लिनिक या रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी, उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी २४ सप्टेंबर रोजी त्याना मेंदुमृत झाल्याचे जाहीर केले. त्यांच्या नातेवाईकांशी चर्चा केल्यानंतर त्यांनी तात्काळ अवयवदानाची तयारी दर्शविली.

रूबी हॉल क्लिनिकमध्ये अवयवदान आणि अवयव प्रत्यारोपणाची अद्ययावत सुविधा आहे. रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारी आणि प्रशासन यांनी याबाबत तत्परता दाखविली. रूग्णालयातील तज्ज्ञ शल्यचिकित्सकांनी डोळे, मूत्रपिंड, फुफ्फुस आणि यकृत हे अवयव दान करण्यात आले.

संघर्ष करून शिक्षण पूर्ण केलेल्या आणि स्वत: आर्थिकदृष्ट्या सक्षम होण्यासाठी धडपडत असलेल्या मनमिळाऊ स्वभावाच्या वर्षा मोहिते ह्या सर्वांना मदतीस सदैव तत्पर असायच्या. कोथरूड परिसरात त्यांनी मोठा सामाजिक गोतावळा निर्माण केला होता. त्यांच्या अकाली मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

मृत्यूनंतरही त्यांच्या अवयवांच्या दानातून त्या समाजाच्या उपयोगी आल्या. याबाबत समाधान व्यक्त करण्यात येत आहे. विद्युतदाहिनीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अवयवदानाचे औदार्य सर्वांनी दाखविले पाहिजे, असे मत सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर व कार्यकर्त्यांनी आदरांजली सभेत व्यक्त केले. त्यांच्या स्मृतिप्रित्यर्थ काही सामाजिक संस्थांना देणगी दिली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dolly Chaiwala: डॉली चायवाला भाजपचा स्टार प्रचारक! नागपूरमध्ये केला महायुतीसाठी प्रचार

SA vs IND: 23 Six, 17 Fours! जोहान्सबर्गच्या मैदानात सॅमसन-तिलकचं वादळ; भारताचं द. आफ्रिकेला तब्बल 284 धावांचं लक्ष्य

SA vs IND: संजू सॅमसनने तिसऱ्या शतकासह रचला इतिहास! तिलक वर्मानेही ठोकली सलग दुसरी Century

Assembly Elections: २४ ते ३० मतदारसंघ महत्त्वाचे! दोन्ही आघाड्यांना बंडाचा फटका बसणार,'शांती' यज्ञासाठी पळापळ सुरू

Dhruv Rathee: ध्रुव राठीचं चॅलेंज आदित्य ठाकरेंनी स्वीकारलं! ‘मिशन स्वराज’साठी शेअर केली मुद्द्यांची यादी

SCROLL FOR NEXT