Vasant_Dada_Patil 
पुणे

सांगवीकरांच्या मागणीला आले यश; वसंतदादा पाटील पुतळ्याचे काम अंतिम टप्प्यात

सकाळ वृत्तसेवा

जुनी सांगवी (पुणे) : गेल्या वर्षभरापासून या ना त्या कारणामुळे जुनी सांगवीचे पूर्व प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेल्या पद्मविभुषण वसंत दादा पाटील पुतळा परिसराचे अंतिम टप्प्यात काम प्रगतिपथावर असून या चौकातील सुशोभिकणामुळे जुनी सांगवीच्या सौंदर्यात भर पडली आहे.

गेली दोन वर्षापासून या पुतळा परिसराचे सुशोभिकरण व्हावे, अशी जुनी सांगवीकरांची मागणी होती. याचे पालिका स्थापत्य विभागाकडून गेल्या वर्षी कामही सुरू करण्यात आले होते. मात्र, पुन्हा लॉकडाऊनमुळे काम थांबल्याने हा पुतळा परिसर झाकण्यात आला होता. याचे पुन्हा काम सुरू करण्यात येऊन ते सध्या अंतिम टप्प्यात प्रगतीपथावर आहे. येथे जुने बांधकाम काढून नवीन ग्रेनाईट मार्बल भिंती आणि सुशोभिकरण करण्यात आल्याने दापोडी सांगवीला जोडणाऱ्या पवना नदीवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुलाजवळ हा पुतळा चौक गेली अनेक वर्षापासून जुनी सांगवीचे पूर्व प्रवेशद्वार अशी ओळख सांगत उभा आहे. सुशोभिरणामुळे येथील सौंदर्यात भर पडली आहे.

येथे पीएमपीएलचा सांगवीकरांचा मुख्य थांबा आहे. एरव्ही येथून पुणे आणि नगरमध्ये जवळपास पन्नास गाड्यांच्या बस फेऱ्या होतात. नागरीकांची मागणी आणि येथील दुरवस्थेच्या प्रश्नाचा पाठपुरावा सकाळमाध्यमातून वेळोवेळी करण्यात आला होता. तर हा पुतळा २३ मे १९८५ रोजी सांगवी पुतळा समितीच्या वतीने महापालिकेस भेट देण्यात आला होता. याचे तत्कालीन विधानपरिषद अध्यक्ष जयवंतराव टिळक, दुग्धविकासमंत्री अनंतराव थोपटे, लक्ष्मणशास्त्री जोशी, अशोक मोहोळ आदींच्या उपस्थितीत अनावरण करण्यात आले होते. त्यानंतर सद्यस्थितीत या पुतळ्याचे नव्याने अठरा लाख रूपये खर्च करून येथे ग्रेनाईट, छत, विद्युतीकरण असे सुशोभिकरण करण्यात आल्याने सांगवीच्या सौंदर्यात भर पडली आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by : Ashish N. Kadam)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amol Javle Won Raver Assembly Election 2024 Result Live: रावेर विधानसभा मतदार संघातून अमोल जावळे विजयी

Vaijapur Assembly Election 2024 Result Live: वैजापुरात शिवसेना विरुद्ध शिवसेना लढतीत रमेश बोरनारे यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates : डॉ. हिकमत उढाण यांचा 2309 मतांनी विजय, सहाव्यांदा टोपेंचा विजय रोखला

Gangapur Assembly Election 2024 Result Live: भाजपचे प्रशांत बंब विजयी, सतिश चव्हाणांवर केली मात

Tanaji Sawant won Paranda Assembly Election 2024 : परांडा मतदारसंघात तिरंगी लढाईत तानाजी सावंत तानाजी सावंत यांनी मारली बाजी

SCROLL FOR NEXT