Vedanta Foxconn sakal
पुणे

वेदांता-फॉक्सकॉनची गुंतवणूक इलेक्ट्रॉनिक पार्टचा तुटवडा कमी करणार

वाहनांची वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी वाहन उद्योगांना येणारी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशनसह इलेक्ट्रॉनिक पार्टच्या तुटवड्याची अडचण आता दूर होणार आहे.

सकाळ वृत्तसेवा

वाहनांची वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी वाहन उद्योगांना येणारी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशनसह इलेक्ट्रॉनिक पार्टच्या तुटवड्याची अडचण आता दूर होणार आहे.

पुणे - वाहनांची वेळेत डिलिव्हरी करण्यासाठी वाहन उद्योगांना येणारी सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशनसह इलेक्ट्रॉनिक पार्टच्या तुटवड्याची अडचण आता दूर होणार आहे. विविध क्षेत्रांसाठी लागणाऱ्या इलेक्ट्रॉनिक पार्टचे उत्पादन करण्यासाठी राज्य सरकारने वेदांता-फॉक्सकॉन या कंपन्यांच्या भागीदारी प्रकल्पासाठी तळेगाव एमआयडीसीमध्ये जमीन देण्याच्या प्रस्तावाला बुधवारी (ता. २७) मंजुरी दिली आहे.

या प्रकल्पासाठी तळेगाव आणि चाकण एमआयडीसीमधील भागात एक हजार एकर जमीन देण्यात आली आहे. वेदांता-फॉक्सकॉन या दोन्ही कंपन्या मिळून सुमारे दोन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक या प्रकल्पात करणार आहे. त्यात प्रामुख्याने सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशनचे उत्पादन केले जाणार आहे. हा प्रकल्प सुरू झाल्यानंतर राज्यासह सर्व देशात असलेल्या सेमीकंडक्टरच्या तुटवड्यातून सुटका होणार आहे. तसेच या माध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सुमारे एक लाख २० हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. या प्रकल्पामुळे तळेगाव एमआयडीसीतील औद्योगिक हालचालींना आणखी वेग मिळणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळातील (एमआयडीसी) अधिकाऱ्यांनी दिली.

गेल्या काही वर्षांत पुणे जिल्ह्यातील वाहन उद्योग क्षेत्राने देशात आपली ओळख निर्माण केली आहे. त्यातून मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात रोजगार निर्मिती झाली आहे. मात्र वाहन क्षेत्रासाठी लागणारे इलेक्ट्रॉनिक बाबी पुरविण्यात अडथळे निर्माण होते होते. कारण इलेक्ट्रॉनिक बाबींची निर्मिती करणाऱ्या पुरेशा कंपन्या पुण्यासह राज्यात नव्हत्या. मात्र वेदांता-फॉक्सकॉनच्या माध्यमातून ही अडचण आता दूर होणार आहे.

सेमीकंडक्टर आणि डिस्प्ले फॅब्रिकेशनच्या उत्पादन सुविधेसाठी वेदांता कंपनी राज्य सरकारशी सक्रिय चर्चा करत होती. प्रकल्पासाठी तमिळनाडू आणि इतर काही राज्यांनी देखील तयारी दर्शवली होती. मात्र कुशल मनुष्यबळाचे केंद्र, बंदराशी असलेला कनेक्ट, अखंड देशांतर्गत पुरवठा-साखळी आणि उच्च विकसित औद्योगिक पायाभूत सुविधा असलेल्या तळेगाव वेदांता आणि फॉक्सकॉनने पसंती दर्शवली आहे.

वेदांता कंपनीबद्दल -

वेदांता लिमिटेड ही वेदांता रिसोर्सेस लिमिटेडची उपकंपनी आहे. तेल आणि वायू, जस्त, शिसे, चांदी, तांबे, लोह, पोलाद, अॅल्युमिनिअम, तेल यावर आधारित उत्पादनांचे उत्पादन करते.

फॉक्सकॉन कंपनीबद्दल : फोक्सकॉन ही आयफोन कंपनीची कंत्राटी उत्पादक कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. तंत्रज्ञान नवकल्पना, सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर एकत्रीकरण आणि औद्योगिक डिझाइनसाठी एकात्मिक दृष्टिकोन असलेले उत्पादन ही कंपनी तयार करते.

गुंतवणुकीचा काय फायदा होणार -

- प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सुमारे एक लाख २० हजार जणांना रोजगार मिळणार

- पुणे वाहन उद्योग क्षेत्रसह इलेक्ट्रॉनिक पार्ट निर्मितीत अग्रेसर होणार

- एकमेकांना पूरक असलेल्या कंपन्यांची संख्या वाढणार

- तळेगाव एमआयडीसीतील औद्योगिक हालचालींना आणखी वेग मिळणार

- वाहनांची वेळेत डिलिव्हरी देता येणार

- इलेक्ट्रॉनिक पार्टची आयात कमी होण्यास मदत होर्इल

प्रकल्पाबद्दल -

- तीन टप्प्यांमध्ये प्रकल्प उभारण्याचे नियोजन

- एक लाख कोटींच्या गुंतवणुकीचे डिस्प्ले फॅब्रिकेशन

- ६३ हजार कोटी रुपये गुंतवणुकीचे सेमी कंडक्टर्स उत्पादन

- ३ हजार ८०० कोटींची सेमीकंडक्टर जुळवणी आणि चाचणी सुविधा केंद्र

राज्यातील गुंतवणूक पुन्हा वाढत असल्याचे यातून स्पष्ट होते. या प्रकल्पामुळे इतर अनेक उद्योग पुण्यात सुरू होतील. त्यामुळे ही गुंतवणूक पुण्यासाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. तसेच वाहन उद्योगाला यातून अधिक गती मिळेल.

- डॉ. सुधीर मेहता, अध्यक्ष, मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड ॲग्रिकल्चर (एमसीसीआयए)

वेदांता-फॉक्सकॉनच्या प्रकल्पासाठी तळेगाव आणि चाकण एमआयडीसीमधील भागात एक हजार एकर जमीन देण्यात आली आहे. यामाध्यमातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या सुमारे एक लाख २० हजार जणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. पुणे हे वाहन उद्योग क्षेत्रात देशात पुढे आहे. मात्र आपल्याकडे इलेक्ट्रॉनिक वस्तू निर्माण करणाऱ्या कंपन्यांची कमतरता आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून आपले इलेक्ट्रॉनिक बाबींची उत्पादन वाढेल. तसेच ही एक मोठी कंपनी आहे. त्यामुळे तिला आवश्‍यक असलेला उत्पादनांची निर्मिती करणाऱ्या इतर कंपन्या देखील एमआयडीसीमध्ये येतील.

- सदाशिव सुरवसे, सहसंचालक, उद्योग विभाग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT