आंबेगाव (पुणे) : लॉकडाउनमुळे आंबेगाव परिसरातील दत्तनगर चौक परिसरात बॅरिकेड्स लावून पोलिसांकडून वाहनांच्या तपासणीला सुरुवात झाली असून विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत आहे. आंबेगाव परिसरातील मेडिकल व डेअरी यांची दुकाने वगळता इतर सर्व दुकाने बंद आहेत. परत एकदा झालेल्या लॉकडाउनचे काही नागरिक तसेच व्यावसायिक समर्थन करत आहे तर काही नाराजी व्यक्त करत आहेत. त्यामुळे या वेळेसच्या लॉकडाउनवर लोकांची काहीशी संमिश्र भुमिका बघायला मिळत आहे.
- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
"माझे सलूनचे दुकान आहे. काही दिवसांपूर्वीच दुकान सुरू झाले होते. आताशी कुठे व्यवसायाची गाडी रुळावर येत होती. पण परत एकदा झालेल्या लॉकडाउनमुळे पुन्हा काही दिवस दुकान बंद ठेवण्याची वेळ आमच्यावर आली आहे. परंतु, वाढती रुग्ण संख्या पाहता लॉकडाउन शिवाय पर्याय नसल्याचे म्हणावे लागत आहे" .
-प्रतिक निकम, सलून व्यावसायिक.
" लॉकडाउन हा आपल्यासाठीच असून नागरिकांनी तो पाळावा, मास्क चा वापर करावा तसेच विनाकारण फिरणाऱ्यांवर कारवाई केली जावी. कारण काही जण लॉकडाउन गांभीर्याने घेत नाहीत. लोकांनी सध्या कामाशिवाय बाहेर न पडलेलच बर होईल "-चंद्रकांत पवार, नागरिक.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.