Dr.Suresh_Gangawane 
पुणे

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पशुवैद्य डॉ. सुरेश गंगावणे काळाच्या पडद्याआड!

सकाळ वृत्तसेवा

पुणे : आंतरराष्ट्रीय कीर्तीचे पशुवैद्य डॉ. सुरेश गंगावणे (वय ७०) यांचे सोमवारी (ता.८) निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते. खासगी रुग्णालयात त्यांना उपचारासाठी दाखल केले होते. मात्र, आज पहाटे त्यांची दवाखान्यातच प्राणज्योत मालवली. 

त्यांच्या मागे पत्नी, विवाहित मुलगा, मुलगी असा परिवार आहे. आज सकाळी त्यांच्या पार्थिवावर वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

मुंबई येथील पशू वैद्यकीय महाविद्यालयातून त्यांनीं पदवी घेतली होती. आपल्या उमेदीच्या कार्यकाळात त्यांनी नाशिक पांजरपोळ, बाएफ आदी ठिकाणी नोकरी केली. स्वतंत्र व्यवसाय करताना कायमच शेतकरी हित डोळ्यासमोर ठेवून कार्य केले.

जनावरांना इंजेक्शन ऐवजी आहारातून तसेच विविध मिनरलद्वारा बरे करता येते, त्यांचे दूध वाढते (गाई, म्हशी, बकरी, मेंढ्या) त्यांची काळजी घेण्यासाठी त्यांनी निरीक्षणातून स्वतःची अशी विशिष्ट अभ्यासशैली बनविली होती. 'दूध दिशा' या पुस्तिकेद्वारा लक्षावधी गो पालक, शेतकरी यांच्यापर्यंत त्यांनी प्रसार केला होता.

आपल्या कृतीतून शेतकरी परिवाराची काळजी घेणाऱ्या डॉ. गंगावणे यांचा पूर्ण भारतभर वावर होता. जवळपास ४५ वर्षांची प्राणीमात्र सेवा आज थांबली. आजारपणाच्या काळात त्यांचं शेतकऱ्यांना फोनद्वारे मार्गदर्शन चालूच होते.

महानंद या संस्थेवर ते काही काळ सल्लागार म्हणून कार्यरत होते. गोकुळ दूध संघ आणि अन्य अनेक संघ, अनेक संस्था व सहकारी संस्थांना त्यांनी कायम मार्गदर्शन केले. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांचा सहभाग होता. शंभराहून अधिक पुरस्कार त्यांना मिळाले होते.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Baba Siddiqui Accused: याआधी तो जेलमध्ये होता, त्याला कुणी बाहेर काढलं माहित नाही... बाबा सिद्दिकींच्या मारेकऱ्यांचे कुटुंबिय नेमकं काय म्हणाले?

रस्त्यावर धावू लागली पेटलेली कार, लोकांची वाहने वाचवण्यासाठी एकच पळापळ; 'बर्निंग कार'चा थरारक Video Viral

जुनं ते सोनं! Mumbai Indians ची धाव तीनवेळा IPL जेतेपद जिंकून देणाऱ्या कोचकडे; फ्रँचायझीने घेतला मोठा निर्णय

Baba Siddique : बाबा सिद्दीकी यांच्यावर गोळ्या झाडणारा एकजण अल्पवयीन? आरोपीने कोर्टासमोर दिली माहिती

Mumbai Indians संघात द्रविडच्या खास माणसाला मिळणार 'जॉब'? पण मग मलिंगा...

SCROLL FOR NEXT