Sharad Pawar: विलास लांडे शरद पवार गटाला मदत करतात,आमदार दिलीप मोहितेंचा आरोप sakal
पुणे

Sharad Pawar: विलास लांडे शरद पवार गटाला मदत करतात,आमदार दिलीप मोहितेंचा आरोप

Bhosari Vidhansabha: उबाठाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार नाही असा राशपच्या इच्छुक उमेदवारांचा दावा आहे.

हरिदास कड

Chakan: अजित पवार गटाचे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी पिंपरी -चिंचवड महानगरपालिकेचे काही नगरसेवक शरद पवार गटाला स्वतः हून त्यांच्या बैठका घेऊन दिले आहेत. माजी आमदार विलास लांडे व त्या संबंधित नगरसेवकांची लोणावळा येथे बैठक झाली त्याचे पुरावे ही आहेत. माजी आमदार विलास लांडे त्या बैठकीला उपस्थित होते.

माजी आमदार विलास लांडे यांनी त्यांच्यात हिंमत असेल तर खेड -आळंदी विधानसभेची निवडणूक माझ्या विरोधात लढवावी असे आमदार दिलीप मोहिते यांनी भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांना खुले आवाहन दिले आहे.चाकण, ता. खेड येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत आमदार दिलीप मोहिते यांनी स्पष्ट सांगितले. खेड तालुक्यात येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी अनेकजण इच्छुक आहेत.

त्यामुळे तालुक्यात राजकीय गरमागरमी मोठी आहे. विविध पक्षाकडे अनेकजण इच्छुक आहेत. खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार म्हणून आमदार दिलीप मोहिते यांची उमेदवारी निश्चित आहे. त्यांच्या विरोधात महाविकास आघाडीचे उमेदवार असणार आहेत त्यांच्यात खरी लढत होणार आहे.या मतदारसंघात शरद पवार गटाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार आहे. उबाठाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळणार नाही असा राशपच्या इच्छुक उमेदवारांचा दावा आहे.

विद्यमान आमदार मोहिते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत आमदार दिलीप मोहिते यांच्या विरोधात शरद पवार गटाकडून मी सेवेकरी सोशल फाउंडेशन चे अध्यक्ष सुधीर मुंगसे उमेदवारी मिळविण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांचे प्रयत्नही जोरात सुरू आहेत.

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अतुल देशमुख,माजी सभापती रामदास ठाकूर हे ही इच्छुक आहेत. सुधीर मुंगसे यांचे सासरे माजी आमदार विलास लांडे यांनी विद्यमान आमदार महेश लांडगे यांना भोसरीत रोखण्यासाठी नगरसेवक अजित गव्हाणे तसेच इतर नगरसेवक यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश दिला आहे. माजी आमदार विलास लांडे यांचे अजित गव्हाणे जवळचे नातेवाईक आहेत.ते ही अजित पवार गटात होते. माजी आमदार विलास लांडे यांचे खेड -आळंदी विधानसभा मतदारसंघात त्यांचे जावई सुधीर मुंगसे यांना विधानसभेची उमेदवारी मिळविण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत.

नगरसेवक व प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यात बैठक झाली. पवारगटाशी सलगी बाळगणाऱ्यांनी अजित पवार गटात राहण्यापेक्षा खुले आम विरोधात जावे. माजी आमदार विलास लांडे यांनी जावयाला पुढे करण्यापेक्षा माझ्या विरोधात स्वतः निवडणूक लढवून दाखवावी असे खुले आवाहन आमदार दिलीप मोहिते यांनी केले आहे. माजी आमदार विलास लांडे यांच्या पक्ष विरोधातल्या वागणुकीबाबत अजित पवार यांच्याकडे तशी तक्रारही राष्ट्रवादी काँग्रेसचे काही पदाधिकारी, कार्यकर्ते करणार आहेत. असे सांगितले.

स्व. माजी उपमुख्यमंत्री आर. आर पाटील गृहमंत्री असताना विलास लांडे यांनी जेष्ठ नेते शरद पवार व आर. आर पाटील यांना माझ्या बद्दल खोटे सांगून मला व माझ्या कार्यकर्त्यांना त्रास दिला होता.माझ्या विरोधात खोटे सांगून शरद पवारांचे मतही माझ्याबद्दल वाईट बनवले होते. खेड तालुक्यात ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा प्रचार न करता बाजार समितीच्या निवडणुकीत भाच्याचा प्रचार लांडे यांनी केला. लोकसभेच्या निवडणूकीत त्यांनी बरोबर राहून पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात काम केलेले आहे असे आमदार दिलीप मोहिते यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rickshaw meter fraud Video: रिक्षाच्या मीटरमध्ये कसा होते फ्रॉड? मुंबई पोलिसांचा लाईव्ह डेमो, क्षणात ओळखा फसवेगिरी

India vs Oman: भारताची विजयी हॅट्ट्रिक; Asia Cupच्या उपांत्य फेरीत धडक

Pune Crime : रविवार पेठेतील ज्वेलर्सच्या दुकानातून पावणेदोन कोटींचे दागिने चोरी

Pune Crime : पाषाण, सदाशिव पेठेतील ज्येष्ठ नागरिकांची ७० लाखांची फसवणूक

Pune Helmet mandatory: पुणे विभागात हेल्मेटसक्ती! विभागीय आयुक्तांचे निर्देश; दुचाकीवर मागे बसणारालाही नियम पाळावा लागेल

SCROLL FOR NEXT