किरकटवाडी: खडकवासला धरणाच्या मागील बाजूस असलेल्या पाटबंधारे विभागाच्या अखत्यारीतील तब्बल 28 एकर जागेवर नियोजित 'मनोरंजन पार्क' विरोधात खडकवासला ग्रामस्थ एकवटले असून याविरोधात उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात येणार असल्याचे खडकवासला गावचे सरपंच सौरभ मते यांच्याकडून सांगण्यात आले. याबाबत सरपंच व गावातील विविध पक्षांतील पदाधिकाऱ्यांची सामाजिक अंतर ठेवून बैठक घेण्यात आली त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला. गेल्या वर्षी खासदार सुप्रिया सुळे खडकवासला विधानसभा मतदार संघात दौऱ्यावर असताना धरणाच्या भिंतीलगत असलेल्या या मोकळ्या जागेचे बागेत रूपांतर करण्याबाबत चर्चा झाली होती. या प्रकल्पाला मंजुरी मिळाली आहे.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मागील आठवड्यामध्ये खडकवासला धरण व परिसराला अचानक भेट देऊन पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या धरणाच्या मागे असलेल्या 28 एकर जागेवर 'बीओटी' तत्त्वावर भव्य मनोरंजन पार्क उभारण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. त्याबाबतची माहितीही जलसंपदा विभागाच्या वेबसाइटवरून देण्यात आलेली आहे. परंतु या निर्णयाला खडकवासला ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे.
लोहगावातील 'त्या' दुकानाची तपासणी करण्यात आली कारण....
खडकवासला धरण व आजूबाजूचा परिसर हा 'रेड झोन' आहे, मग त्याकडे दुर्लक्ष करून घाईघाईने निर्णय घेण्याची गरज काय?, शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत करताना धरणासाठी करण्यात आलेल्या आहेत; मग त्या खाजगी व्यावसायिकांच्या घशात घालण्याचा डाव कशासाठी? सदर निर्णय प्रक्रियेत ग्रामस्थ व ग्रामपंचायत यांना कोणत्याही प्रकारे विश्वासात घेण्यात आलेले नाही, धरणाच्या मागे असलेल्या यशवंत विद्यालय या रयत शिक्षण संस्थेच्या शाळेला हक्काची जागा मिळत नाही; मग पर्यटन केंद्राला जागा देण्यास पाटबंधारे विभाग कसा तयार होतो? अशा विविध मुद्यांवर खडकवासला ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केला आहे.
जुन्नरची सुरु होती कोरोनामुक्तीकडे वाटचाल पण...
खडकवासला गावाच्या आजूबाजूला असलेल्या नांदेड, किरकटवाडी,नांदोशी-सणसनगर या गावांसाठी पिण्याच्या पाण्याच्या विहिरींसाठी आवश्यक असलेली जागा कित्येक दिवस मागणी करूनही मिळत नाही. या गावांमध्ये नागरीकरण मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने भविष्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या या गावांमध्ये निर्माण होणार आहे. ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्याकडे पाटबंधारे विभागाने गांभीर्याने लक्ष देण्याऐवजी पाटबंधारे विभागाकडून अनावश्यक गोष्टींकडे लक्ष दिले जात असल्याबाबतची भावना नागरिकांमध्ये आहे.
कोरोनाविरोधात लढा देऊन मेट्रोचे 'ते' मजूर पुन्हा कामावर
खाजगी व्यवसायिकांना पर्यटन केंद्राच्या नावाखाली 99 वर्षांच्या भाडेकराराने पाटबंधारे विभाग मोकळ्या जमिनी वापरासाठी देणार आहे. अनेक व्यावसायिकांकडून खडकवासला धरणाच्या आजूबाजूच्या व धरणाच्या मागील असलेल्या जमिनीची पाहणीही केली जात आहे. पाटबंधारे विभागाकडून मागील एक महिन्यापूर्वी पाटबंधारे विभागाच्या ताब्यात असलेल्या जमिनीची मोजणीही करून घेण्यात आलेली आहे.
सलून दुकाने सुरु करण्याची परवानगी द्या; अन्यथा...
''कोणत्याही परिस्थितीत हा पर्यटन प्रकल्प किंवा धरणाच्या लगतच्या जमीनीचा व्यवसायिक वापर खडकवासला ग्रामस्थांकडून होऊ दिला जाणार नाही. सदर प्रकल्पाची निविदा प्रक्रिया तातडीने थांबवावी'' असे निवेदन पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता विजय पाटील यांना देण्यात येणार आहे. या बैठकीसाठी सरपंच सौरभ मते, तंटामुक्त समिती अध्यक्ष अक्षय दत्तात्रय मते, पोलीस पाटील ऋषिकेश प्रकाश मते, विलास मते, अशोक लक्ष्मण मते, सिताराम सादबा मते, मुरलिधर मते, सुरेश तुकाराम मते, आनंद माधव मते, विजय बाबासाहेब मते, महेश लक्ष्मण मते, राहुल मुरलिधर मते, नंदकिशोर जगन्नाथ मते,संग्राम शांताराम मते आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.