Rain sakal
पुणे

Rain : विमाननगर आणि वडगाव शेरी पावसामुळे तुंबले; वाहनांचे नुकसान, जागोजागी वाहतूक कोंडी

सकाळ वृत्तसेवा

वडगाव शेरी - चेंबरची, नाल्यांची सफाई, पावसाळी वाहिन्या टाकणे या सर्व कामांवर पुणे महानगरपालिकेने खर्च केलेल्या कोट्यावधी रुपयांच्या निधीचे पितळ आज थोडा वेळ झालेल्या पावसामुळे उघडे पडले. विमान नगर आणि वडगाव शेरी भागात जागोजागी पाणी तुंबले. त्यात पाणी अडकून वाहनांचे नुकसान झाले शिवाय मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीचा सामना नागरिकांना करावा लागला.

नगर रस्ता परिसरात साडेचार वाजता मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यानंतर थोड्याच वेळात विमान नगर चौक, विमानतळ रस्ता, गंगापूरम चौक, श्रीकृष्ण हॉटेल जवळील छागला चौक, वडगाव शेरी येथील व्हिडिओज सोसायटी समोरील इंदिरा स्मृती सोसायटी या सर्व ठिकाणी गुडघाभर पाणी साचले होते.

विमान नगर येथील विमानतळ रस्त्यावर सिम्बॉयसिस कॉलेजच्या जवळ रस्त्यावर कमरे इतके पाणी साचले. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे विमानतळाकडे जाणारी वाहने पाण्यात अडकली. काही वाहने बंद पडली. त्यामुळे नागरिकांनी प्रसंगावधान राखून वाहतूक थांबवली आणि ती दुसरीकडून वळवली. वाहतूक पोलिसांनी स्वतः पुढाकार घेत चेंबरचे झाकण उघडून पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला.

गंगापूरम चौकातही लाखो रुपये खर्चून टाकलेल्या पावसाळी वाहिन्यांचा फोलपणा समोर आला. येथे कमरे इतके पाणी साचले. त्यातही वाहने बंद पडली. त्यामुळे गंगापूरम चौकात चारही दिशेने मोठी वाहतूक कोंडी झाली.

वडगाव शेरी येथे इंद्रा स्मृती सोसायटीत गुडघाभर पाणी साचून अनेक वाहनांचे नुकसान झाले. येथील काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महानगरपालिका प्रशासनाशी संपर्क साधून पाण्याला वाट करून देण्याचा प्रयत्न केला.

सायंकाळी कामावरून सुटण्याची वेळ असल्यामुळे आणि जागोजागी पाणी तुंबलेले असल्यामुळे वाहतूक संथ झाली आणि विमाननगर, विमानतळ रस्ता, नगर रस्ता, शास्त्रीनगर या सर्व भागात प्रचंड वाहतूक कोंडी झाली. नगर असतात क्षेत्रीय कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त सोमनाथ बनकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र तो होऊ शकला नाही.

स्वप्निल पिंगळे (स्थानिक नागरिक)

रस्त्याखाली पावसाळी लाईन आणि रस्त्यावर गुडघाभर पाणी, हे चित्र पाहून विकास कामातील फोलपणा लक्षात येतो. आता तरी प्रशासनाने जागे होऊन पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करावीत. आजच्या वाहतूक कोंडीने मोठा मनस्ताप सहन करावा लागला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तो जगला, तरच देश जगेल

कृषिक्षेत्र आधुनिकतेच्या दिशेनं

जातिनिहाय जनगणनेची अपरिहार्यता

निवडणूक काश्मीरची; परीक्षा केंद्राची

संघ भाजपच्या मदतीला येणार...

SCROLL FOR NEXT