Vishwambhar Chaudhary criticizes Nitin Gadkari 
पुणे

Joshimath : 'गडकरीकृत' विकास हिमालयात असा चालला आहे; विश्वंभर चौधरींचं टीकास्त्र

सकाळ डिजिटल टीम

Joshimath : देशभरात सध्या जोशीमठ चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या काही दिवसांपासून जोशीमठ परिसरात भूस्खलन आणि जमिनीला भेगा पडत आहेत. अनेक नागरिकांच्या घराला देखील भेगा पडल्या आहेत. लोक बेघर होत आहेत. ७०० हून अधिक घरांना भेगा पडल्या आहेत. तर रस्ते, हॉटेल, दवाखाने यांच्या भिंतींनाही भेगा पडल्या आहेत. त्यामुळे सामान्य लोकांच्या जनजिवन विस्कळीत झाले आहे. (Vishwambhar Chaudhary criticizes Nitin Gadkari on Joshimath issue)

जोशीमठ येथे सध्या अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते विश्वंभर चौधरी यांनी काही गंभीर प्रश्न उपस्थित करत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्यावर टीका केली आहे. 

विश्वंभर चौधरी म्हणाले, "जोशीमठाची चर्चा चालू आहे पण आता बोलायचाही कंटाळा आला आहे. गेल्या मे महिन्यातले हे कांडाघाट सिमला भागातले फोटो आहेत. 'गडकरीकृत' विकास हिमालयात हा असा चालला आहे. अत्यंत विध्वंसक पद्धतीनं डोंगर उभे कापले जात आहेत."

"गडकरी साहेबांना अमूक इतक्या दिवसात तमूक इतक्या किलोमीटरचे रस्ते करायचे आहेत. हिमालयच राहिला नाहीत तर रस्ते आणि विकास दोन्ही वाहून जाणार आहेच पण अजूनही डोळे उघडत नाहीत. नको तिथं धरणं बांधणं, नको त्या योजना राबवून विध्वंस करणं आणि नियोजन शून्य विकास," असे विश्वंभर चौधरी यांनी म्हटले आहे. 

जोशीमठ पूर्णपणे उद्ध्वस्त होणार?

दरम्यान जोशीमठमुळे संपूर्ण देश चिंतेत आहे. यामध्ये इस्रोने आणखी चिंता वाढवली आहे. इस्रोने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून जोशीमठच्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे. या उपग्रहाने दिलेल्या माहितीनुसार, लवकरच जोशीमठ पूर्णपणे उद्ध्वस्त होणार आहे. इस्रोने आपल्या उपग्रहाच्या माध्यमातून घेतलेल्या काही फोटोंवर तांत्रिक प्रक्रिया केली.

त्यानंतर कोणता भाग खचला आणि कोणता भाग खचू शकतो, हे स्पष्ट केले. एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत जमीन खचण्याचा वेग कमी होता. या कालावधीत जोशीमठ ८ ते ९ सेंटिमीटरपर्यंत खचला होता. पण २७ डिसेंबर पासून ८ जानेवारी २०२३ पर्यंतच्या १२ दिवसांमध्ये ही तीव्रता ५.४ सेटिंमीटर झाली आहे, त्यामुळे जमीन खचण्याचा वेग वाढला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aheri Assembly Election Results 2024 : बापाने केला लेकीचा पराभव! अहेरी मतदारसंघात धर्मरावबाबा आत्राम यांनी मारली बाजी

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: मालेगावमतदार संघात शिवसेनेचे उमेदवार दादा भुसे १ लाख ६ हजार ००६ मतांनी विजयी

khadakwasla Assembly Election 2024 Result Live: खडकवासलात भाजपचा विजयाचा चौकार, भीमराव तापकीर यांनी पुन्हा मारली बाजी

Rajan Naik Nalasopara Assembly Election 2024 Result : नालासोपाऱ्याचा गड भाजपचाच; राजन नाईक यांचा दणदणीत विजय

Dapoli Assembly Election 2024 Results : दापोलीत आमदार योगेश कदमांनी राखला गड; ठाकरे गटाच्या संजय कदमांचा केला पराभव

SCROLL FOR NEXT