Loksabha Election Voting sakal
पुणे

Loksabha Election Voting : पुण्यात ३.४० टक्क्यांनी वाढ ;शिरूर, मावळ लोकसभेला मतदानाचा टक्का घसरला

पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी ५३.५४ टक्के, शिरूर लोकसभा मतदारसंघात ५४.१६ टक्के, तर मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.५७ टक्के मतदान झाले आहे.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघात सोमवारी ५३.५४ टक्के, शिरूर लोकसभा मतदारसंघात ५४.१६ टक्के, तर मावळ लोकसभा मतदारसंघात ५४.५७ टक्के मतदान झाले आहे. २०१९ च्या तुलनेत पुण्यात मतदानात ३.४० टक्क्यांनी वाढ झाली असली, तरी शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघांत मात्र मतदानाचा टक्का घसरला आहे.

या तिन्ही मतदारसंघांत मतदान करणाऱ्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीविरुद्ध महायुतीच्या रणसंग्रामात कोण बाजी मारणार, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. लोकसभा निवडणुकीची अंतिम आकडेवारी मंगळवारी जाहीर करण्यात आली.

पुणे लोकसभा मतदारसंघात सहा विधानसभा मतदारसंघांचा समावेश होतो. पुणे लोकसभा मतदारसंघात प्रमुख दोन पक्षांसह ३५ उमेदवार रिंगणात होते. परंतु महाविकास आघाडीविरुद्ध महायुती अशी दुरंगी लढत झाली. पुण्यात मतदानात चांगली वाढ होण्याचा अंदाज होता. प्रत्यक्षात मात्र ५३.५४ टक्के मतदान झाले. मतदानाची अंतिम आकडेवारी आल्यानंतर राजकीय नेत्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे सुरू झाले आहेत.

चिंचवड ठरविणार मावळचा विजय

शिवसेनेच्या दोन्ही गटांत लढत असलेल्या मावळ मतदारसंघात २०१९च्या तुलनेत ४.५८ टक्क्यांनी मतदान घसरून यंदा ५४.८७ टक्के मतदान झाले आहे. मात्र येथेही मतदारांची संख्या सुमारे ५२ हजारांनी वाढली आहे. उद्धव ठाकरेविरुद्ध मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अशी थेट लढत असल्याने सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाढलेल्या मतदानाचा फायदा घेत शिवसेनेचे (शिंदे गट) उमेदवार श्रीरंग बारणे हॅटट्रिक करणार की शिवसेनेचे (उबाठा) उमेदवार संजोग वाघेरे त्यांना रोखणार?, याकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागले आहे. या मतदार संघातील तीन विधानसभा मतदारसंघ पुणे जिल्ह्यात तर तीन रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागातील आहेत. या लोकसभा मतदारसंघात जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार संख्या असलेल्या चिंचवड विधानसभा मतदारसंघ येतो. याच मतदारसंघातील दोन्ही उमेदवार आहेत. त्यामुळे याच मतदार संघावर विजयाची गणिते ठरणार आहेत.

शिरूर लोकसभा मतदारसंघात यंदा ५४.१६ टक्के मतदान झाले आहे. गतवेळेपेक्षा सुमारे ६.५० टक्क्यांनी मतदान कमी झाले आहे. टक्का घसरला असला, तरी मतदान करणाऱ्यांच्या संख्येत ८५ हजारांनी वाढ झाली आहे. त्यामुळे वाढलेले मतदान कोणाला पोषक ठरणार?, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.

या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यामध्ये लढत होती. या मतदारसंघातील हडपसर हा पुणे शहराशी, तर भोसरी हा पिंपरी-चिंचवड शहराशी लगत असलेला शहरी भाग आहे.

या भागात मतदानाचा टक्का घसरला आहे. याउलट ग्रामीण भागातील चारही मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी वाढली आहे. त्यामुळे तुतारी वाजणार की धनुष्यबाण चालणार? यावरून राजकीय वर्तुळात चर्चेचे फड रंगू लागले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT