Wadaj dam  sakal
पुणे

वडज धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह सुरु:

कुकडी प्रकल्पात २३.४५ टक्के उपयुक्त पाणीसाठा

सकाळ वृत्तसेवा

नारायणगाव : कुकडी प्रकल्पाअंतर्गत धरणांच्या उपयुक्त पाणीसाठ्यात बारा तासात २.४१५ टीएमसीने वाढ झाली आहे. प्रकल्पाअंतर्गत वडज धरणाच्या सांडव्यावरून पाण्याचा प्रवाह मीना नदी पत्रात सुरू झाला आहे.येडगाव व वडज धरणात सुमारे पन्नास टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला असून प्रकल्पाअंतर्गत महत्वाच्या पिंपळगाव जोगे धरणात उपयुक्त पाणीसाठा होण्यास सुरुवात झाली आहे. आशी माहिती कुकडी पाटबंधारे विभाग क्र.१ चे कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर व शाखा अभियंता टी. एन. चिखले यांनी दिली.

कार्यकारी अभियंता प्रशांत कडूसकर म्हणाले कुकडी प्रकल्पाअंतर्गत येडगाव, माणिकडोह, वडज, पिंपळगाव जोगे,डिंभे धरणात १ जुलै २०२२ अखेर १.६७ टीएमसी (५.६६ टक्के) नीचांकी उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता.

मात्र मागील चार पाच दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पाच्या पाणी साठ्यात ८ टीएमसीने वाढ झाली आहे.वडज धरणांत ४४ टक्के उपयुक्त पाणी साठा झाल्याने सांडव्यावरून आज सकाळ पासून मीना नदी पत्रात पाणी वाहू लागले आहे.वडज धरणाचे दरवाजे १ ऑगस्ट नंतर बंद करण्यात येणार आहेत. धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचे प्रमाण आज सकाळ पासून कमी झाले आहे.

मात्र भात खाचरे, नाले, ओढे व डोंगर उतारावरील पाण्याचा प्रवाह सुरू असल्याने धरणांच्या पाणी पातळीत रोज दीड ते दोन टीएमसीने वाढ होत आहे.मात्र सुमारे तेरा टीएमसी उपयुक्त पाणी साठवण क्षमता असलेल्या डिंभे धरणात केवळ २.३६३ टीएमसी ( १८.९२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे.कुकडी प्रकल्पात एकूण ६.९५८ टीएमसी( २३.४५ टक्के) उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. धरण निहाय झालेला उपयुक्त पाणीसाठा टीएमसी,(कंसात टक्के): येडगाव :०.९८८ (५०.८४ ),वडज:०.५२४( ४४.७१ ) , माणिकडोह: २.७६२ (२७.१४), डिंभे : २.३६३ ( १८.९२ ) पिंपळगाव जोगे : ०.३१९(८.२१)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Elections: मुंबईत शिवसेनेला उभारी मिळणार? महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार...

Unsold Player List IPL 2025 Auction: पृथ्वी, शार्दूल ते वॉर्नर यांच्यासह ११० खेळाडू राहिले अनसोल्ड, वाचा संपूर्ण लिस्ट

MLA Rohit Pawar : आपले उद्योग गुजरातला, तेथील ईव्हीएम महाराष्ट्रात

हैतीमध्ये अराजकता! टोळीयुद्धात शेकडो जणांचा मृत्यू, अल्पवयीन मुलांची टोळ्यांमध्ये भरती

Mumbai Indians Squad IPL 2025: मुंबई इंडियन्सचा संघ दिसतोय तगडा, RCB च्या स्टार खेळाडूला सोबत घेऊन मारली बाजी

SCROLL FOR NEXT