CISF sakal
पुणे

CISF : ‘सीआयएसएफ’ची प्रतीक्षा संपली;५० जवान दाखल,नवे टर्मिनल ११ जुलैपर्यंत खुले होण्याची शक्यता

केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अतिरिक्त जवान पुण्यात दाखल होण्यास सुरुवात झाली.

सकाळ वृत्तसेवा

पुणे : केंद्रीय गृह मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे (सीआयएसएफ) अतिरिक्त जवान पुण्यात दाखल होण्यास सुरुवात झाली. पुणे विमानतळावर गुरुवारी (ता. ४) सुमारे ५५ जवान दाखल झाले असून तूर्त त्यांची नियुक्ती जुन्या टर्मिनलवर केली आहे. येत्या दोन ते तीन दिवसांत उर्वरित जवानही दाखल होतील. त्यामुळे नवे टर्मिनल १० अथवा ११ जुलैला प्रवाशांसाठी खुले होण्याची शक्यता विमानतळ प्रशासनाने व्यक्त केली आहे.

विमानतळाच्या नवीन टर्मिनलचे उद्‍घाटन होऊन सुमारे चार महिने झाले. मात्र प्रवासी सेवा सुरू न झाल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली होती. यापूर्वी ‘बिकास’ (ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटी) संदर्भात मंजुरी मिळाली होती. त्यानंतर नवीन टर्मिनलवरील ‘एफ अँड बी’ला देखील मंजुरी मिळाली. नवीन टर्मिनल खुले होण्याकरिता ‘सीआयएसएफ’च्या २४१ जवानांची नियुक्ती आवश्यक होती. त्या प्रस्तावालाही मंजुरी मिळाली. नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केल्यानंतर त्याला गती आली. गुरुवारपासून ‘सीआयएसएफ’चे जवान येण्यास सुरुवातही झाली. विमानतळ प्रशासनाने त्यांना बॅरेक देण्यास सुरुवात केली आहे. २४१ जवान दाखल झाल्यावर त्यांना नवीन टर्मिनलवर नियुक्त केले जाणार आहे.

कामे अधिक गतीने :

जुन्या टर्मिनलवर प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ४५० ‘सीआयएसएफ’ जवान नियुक्त आहेत. नवीन टर्मिनल जुन्याच्या तुलनेत मोठे आहे. त्यामुळे विमानांची व प्रवाशांची संख्या वाढणार आहे. हे लक्षात घेऊन विमानतळ प्रशासनाने ‘सीआयएसएफ’ जवानांची संख्या वाढविण्याची मागणी केली होती. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यामुळे विमानतळावर ६९१ जवान असतील. जवानांची संख्या वाढल्याने चेकइन, सिक्युरिटी चेकइन आदी कामे अधिक गतीने होतील.

नवीन टर्मिनलसाठी ‘सीआयएसएफ’च्या अतिरिक्त जवानांची मागणी केली होती, ती मान्य झाली. आता नियुक्तीसाठी जवान पुण्यात दाखल होण्यास सुरुवात झाली आहे.

- संतोष ढोके, विमानतळ संचालक, पुणे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT