walchandnagar 630 workers issue will solve ajit pawar dattatray bharane meeting Sakal
पुणे

Pune News : वालचंदनगरच्या कामगारांचे आमदार भरणे यांना साकडे; उपमुख्यमंत्री अजित पवारांसाेबत लवकरच बैठक

कामगारांच्या प्रश्‍न सोडविण्याची भरणे यांची ग्वाही

राजकुमार थाेरात

वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील कामगारांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांना साकडे घालून कंपनीतील ६३० कामगारांचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली.

वालचंदनगर(ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील आयएमडी कामगार समन्वय संघाच्या ६३० कामगारांनी २२ नोव्हेंबर पासुन संपाला सुरवात केली. कामगारांनी शांततेमध्ये आंदोलन सुरु ठेवले आहे.

अर्धनग्न आंदोलन करुन कामगारांनी प्रशासनाने लक्ष वेधले होते. तीन आठवड्यापेक्षा जास्त काळ संप सुरु आहे. आज रविवारी संपाचा २६ वा दिवस होता. आज रविवारी सर्व कामगारांनी भरणेवाडी (ता.इंदापूर) येथे आमदार दत्तात्रेय भरणे यांची भेट घेतली.

भरणे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये वालचंदनगर कामगारांचा प्रश्‍न पॉईंट ऑफ इन्फॉरमिशनच्या माध्यमातुन मांडून कामगारांच्या प्रश्‍न सोडविण्यासाठी कामगारमंत्री, पालकमंत्री,उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित बैठक घेवून कामगारांचा प्रश्‍न तातडीने मार्गी लावण्याची विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये मागणी केली होती.

हिवाळी अधिवेशनामध्ये वालचंदलनगरचा प्रश्‍न मांडल्याबद्दल कंपनीतील कामगारांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे अभिनंदन करुन आभार मानले. तसेच कंपनीतील कामगारांचा वेतनवाढीचा तसेच थकीत देण्याचा प्रश्‍न सोडविण्याची मागणी केली.

यावेळी भरणे यांनी सांगितले की, तालुक्यातील जनतेचे प्रश्‍न सोडविणे माझे कर्तव्य आहे. वालचंदनगरच्या कामगारांच्या प्रश्‍नावरती माझे बारीक लक्ष आहे. कामगारांचा प्रश्‍न महत्वाचा आहे. तो सोडविण्याचा माझा प्रयत्न सुरु आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंपनीच्या मालकाशी फोनवरुन चर्चा केली आहे. पुुढील आठवड्यामध्ये तातडीने राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या समवेत वालचंदनगर कंपनीचे मालक, कामगार आयुक्त, व्यवस्थापनातील अधिकारी, युनियनचे पदाधिकारी यांच्यामध्ये बैठक घेवून कामगारांचा प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

प्रश्‍न सुटण्यासाठी कामगारांनी व व्यवस्थापनानेही लवचिक भूमिका घेणे गरजेचे आहे. कामगारांनी दोन पावले पुढे यावे ,तसेच कंपनीच्या व्यवस्थापनाने ही दोन पावले पुढे येणे महत्वाचे आहे. कामगारांचा संप हा कामगारांना,कंपनीला व परीसराला परवडणारा नसल्याचे यावेळी भरणे यांनी सांगितले. यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील उपस्थित होते.

भरणे यांनी सत्कार टाळला..

वालचंदनगर कंपनीतील कामगारांचा प्रश्‍न हिवाळी अधिवेशनामध्ये मांडल्याबद्दल वालचंदनगरचे कामगार भरणे यांचा सत्कार करणार होते. मात्र भरणे यांनी सत्कारापेक्षा कामगारांचा प्रश्‍न महत्वाचा असून आदोगर कामगारांचा प्रश्‍न सोडविणार असल्याचे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Vote Counting Live Updates: पुण्यात विजयी मिरवणूक काढण्यास सक्त मनाई; जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Mumbai Assembly Election Results 2024 LIVE Counting: माहीम मतदारसंघात चोख सुरक्षा व्यवस्था

Bacchu Kadu Update: निवडणूक निकालापूर्वी बच्चू कडूंचा निकाल लागला, कोर्टाने काय दिला निर्णय?

Chandrapur Assembly Constituency Result 2024 : चंद्रपूर मतदारसंघात भाजप आपला बालेकिल्ला मिळवणार? किशोर जोर्गेवार विरुद्ध प्रवीण पाडवेकर

Versova Assembly Constituency Result: भारती लव्हेकर विरुद्ध हारून खान

SCROLL FOR NEXT