mla dattatray bharane sakal
पुणे

Walchandnagar News : आमदार भरणे यांच्या तत्परतेमुळे सात दिवसामध्ये मिळाले मुख्यमंत्री सहायत्ताच्या मदतीचे धनादेश

विहीर दुर्घटनेतील मयत झालेल्या व्यक्तिीच्या वारसांना सात दिवसामध्येच मुख्यमंत्री सहायत्ता निधीमधून मिळाले मदतीचे धनादेश.

सकाळ वृत्तसेवा

वालचंदनगर - इंदापूरचे आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या तत्परतेमुळे म्हसोबाचीवाडीतील विहीर दुर्घटनेतील मयत झालेल्या व्यक्तिीच्या वारसांना सात दिवसामध्येच मुख्यमंत्री सहायत्ता निधीमधून प्रत्येकी पाच लाख रुपयांच्या मदतीचे धनादेश मिळाले. आमदार दत्तात्रेय भरणे यांनी कुटुंबाकडे धनादेश सुर्पुद केले.

म्हसोबाचीवाडी (ता. इंदापूर) येथे १२७ फुट खोल विहिरीच्या रिंगचे काम करीत असताना माती व मुरुम ढासळल्याने मंगळवार (ता. १) रोजी बेलवाडी मधील सोमनाथ लक्ष्मण गायकवाड, जावेद अकबर मुलाणी, परशुराम बन्सी चव्हाण, व लक्ष्मण उर्फ मनोहर मारुती सावंत हे चार मजूर विहिरीमध्ये माती व मुरुमाच्या ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने मृत्यू झाल्याची घटना घडली.

शुक्रवार (ता. ४) रोजी चौघांचे मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यामध्ये प्रशासनाला यश आले. आमदार दत्तात्रेय भरणे यांनी तत्परतेने पावसाळी अधिवेशानामध्ये दुर्घटनेतील सविस्तर माहिती सांगून तातडीने मदत देण्याची मागणी केली.

राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार यांनी तातडीने मुख्यमंत्री सहायत्ता निधीमधून प्रत्येकी कुंटूबाला ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली. मदत जाहीर झाल्यानंतर आमदार दत्तात्रेय भरणे यांनी मंत्रालय, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा सुरु करुन सात दिवसामध्येच प्रत्येकी कुंटूबाला ५ लाख रुपयांचा धनादेश मिळवून दिला.

आज शुक्रवार (ता. ११) रोजी सकाळी भरणे यांच्या हस्ते मयत झालेल्या व्यक्तिच्या वारसाकडे धनादेश सुर्पुद करण्यात आले. तसेच त्यांच्या वारसांना शासनाच्या संजय गांधी निराधार योजना व घरकुल योजनेचा लाभ देण्याचे आश्वासन देण्यात आले.

यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, नेचर डेअरीचे अध्यक्ष अर्जुन देसाई, श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष कांतीलाल जामदार, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, जिल्हा नियोजन समितीचे माजी सदस्य सचिन सपकळ, अ‍ॅड. शरद जामदार, अॅड. शुभम निंबाळकर, पंकज जामदार उपस्थित होते.

आमदार दत्तात्रेय भरणे यांचे मानले आभार

अनेकवेळा सरकारी मदत जाहीर होते, मात्र मिळण्यास विलंब होत असतो. सर्वसामान्य नागरिकांना मदतीचा धनादेश मिळविण्यासाठी शासकीय कार्यालयामध्ये हेलपाटे मारावे लागतात. मात्र आमदार दत्तात्रेय भरणे यांच्या प्रयत्नामुळे बेलवाडी मधील चार कुंटूबाना सात दिवसामध्येच मुख्यमंत्री सहायत्ता निधीमधून २० लाख रुपयांची मदत मिळाल्याबद्दल बेलवाडीच्या नागरिकांनी आमदार दत्तात्रेय भरणे यांचे आभार मानले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Assembly Election 2024 Results Live Updates: राज्यातील सर्व मतदारसंघांच्या निकालाचे अपडेट्स एका क्लिकवर

Pune Online Fraud : ‘डिजिटल अरेस्ट’ करून आयटी अभियंत्याला सहा कोटींचा गंडा; सेवानिवृत्तीला काही महिने शिल्लक असताना बॅंक खाते रिकामे

Constitution of India : आणीबाणीतील सर्वच निर्णय रद्द करण्यासारखे नाहीत; सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वपूर्ण निरीक्षण

Pollution : बालकांचे भविष्य संकटात! दिल्लीसह उत्तर भारतात राष्ट्रीय प्रदूषण आणीबाणीची स्थिती; राहुल गांधींकडून चिंता व्यक्त

JP Nadda : अराजकाला काँग्रेसकडून चिथावणी; मणिपूर हिंसाचारप्रकरणी भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांचा आरोप

SCROLL FOR NEXT