वालचंदनगर : वालचंदनगर (ता.इंदापूर) येथील वालचंदनगर कंपनीतील कामगारांच्या प्रश्नासाठी पवार साहेब (शरद पवार) लवकरच बैठक घेणार असून कामगारांचा प्रश्न मार्गी लागणार असल्याची ग्वाही बारामती लोकसभा मतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
वालचंदनगर (ता.इंदापूर) येथे वालचंद हिराचंद यांच्या १४१ व्या जयंती निमित्त आयोजित केलेल्या सम्राट अशोक चषक क्रिकेट स्पर्धेच्या उद्घघाटनप्रसंगी आयाेजित केलेल्या कार्यक्रमामध्ये बोलत होत्या.
यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी सभापती प्रवीण माने,इंदापूर तालुका राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष अॅड. तेजसिंह पाटील, कार्याध्यक्ष महारुद्र पाटील,पुणे जिल्हाचे सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष सागर मिसाळ, महिला अध्यक्ष छाया पडसळकर,युवकचे अध्यक्ष अनिकेत निंबाळकर,
विकास खिलारे,सुनिल साबळे, क्रिकेट स्पर्धेचे आयोजक व इंदापूर तालुका युवक काॅग्रेसचे अध्यक्ष मिलिंद साबळे उपस्थित होते. यावेळी सुळे यांनी सांगितले की, वालचंदनगरच्या कामगारांचा प्रश्न हा कुंटूबातील प्रश्न आहे.
तो प्रेमाने सोडवला जाईल. या प्रश्नासंदर्भात माझी पवारसाहेबाबरोब चर्चा झाली आहे. लवकर साहेब मिटिंग घेणार आहेत.वालचंदनगरच्या कामगारांच्या प्रश्नामध्ये कसल्याही प्रकाराचे राजकारण आणले जाणार नाही.
तालुक्याचे आमदार दत्तात्रेय भरणे, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचीही मदत घेण्यात येईल.आपण सर्वांनी एक पाउल पुढे टाकू. कंपनीतील सर्व कामगार लवकरच कामावर जातील. व वालचंदनगर मध्ये दिवाळी साजरी होणार असल्याचे असे सांगितले. आज कामगारांच्या संपाचा ३७ वा दिवस होता.कंपनीतील ६३० कामगार संपावरती आहेत.
संसदेमध्ये भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे (इस्त्रो) नाव निघाल्यानंतर वालचंदनगरचे संसदेमध्ये नाव निघते. देशासाठी व इस्त्रोसाठी वालचंदनगर कंपनीचे योगदान मोठे आहे. मी इंजिनिअर नसले तरीही वालचंदनगरचे नाव निघाल्यानंतर माझी कॉलर टाईट होते असल्याचे सांगून माझ्या मतदार संघाचा मला अभिमान असल्याचे सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.