khadkwasla dam sakal media
पुणे

Warning Pune: पुणेकरांना सतर्कतेचा इशारा! शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं फुल्ल; नदीपात्रात होणार विसर्ग

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : परतीच्या पावसानं पुणे शहर आणि जिल्ह्यात जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस कोसळत असल्यानं पुणे शहरासह पिंपरी-चिंचवड शहराला पाणीपुरवठा करणारी पाचही धरणं शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळं या धरणांमधून मुळा-मुठा तसंच पवना नदी पात्रातील विसर्ग वाढवण्यात येणार आहे. त्यामुळं नदीकाठच्या लोकांनी पूरस्थितीपासून सावध रहावं असा इशारा जलसंपदा विभागाकडून देण्यात आला आहे.

पुणेकरांना इशारा

पुणेकरांना सतर्कतेचा इशारा देणारं एक निवेदन खडकवासला पाटबंधारे विभागानं प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये म्हटलं की, पुणे शहराजवळील खडकवासला धरण ९०.३९ टक्के, पानशेत १०० टक्के, वरसगाव १०० टक्के आणि टेमघर १०० टक्के एवढ्या क्षमतेनं भरलेले आहेत. तसंच पिंपरी-चिंचवड शहराशी संलग्न असलेले पवना धरण १०० टक्के क्षमतेनं भरलेलं आहे. त्यामुळं पुढील पावसाळा कालावधीसाठी पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांनी सतर्क व दक्ष राहणं आवश्यक आहे.

२४ सप्टेंबर २०२४ ते २९ सप्टेंबर २०२४ या कालावधीत हवामान विभागानं अतिवष्टीचा अंदाज दिल्यामुळं मुळा व पवना नदीपात्रात मोठ्या प्रमाणात विसर्ग होण्याची शक्यता आहे. तसंच त्यानंतर पर्जन्यमानानुसार धरणातून नदीपात्रात होणारा विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्यात येईल.

यापार्श्वभूमीवर पुणे महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी मुठा नदीपात्र व पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रातील नागरिकांनी पवना नदीपत्रातील निषिद्ध क्षेत्रामध्ये (ब्लू लाईन एरिया) उतरू नयेआणि नदीपात्रात काही साहित्य अथवा जनावरे असल्यास तात्काळ ती सुरक्षित ठिकाणी हालवण्यात यावीत. तसंच सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी नदीपात्रात उतरु नये.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mobikwik IPO: मोबिक्विकला ७०० कोटी रुपयांच्या आयपीओसाठी सेबीची मान्यता

Mumbai Metro 3: मुंबईतल्या पहिल्या अंडरग्राऊंड मेट्रोचं काम पूर्ण; थांबे, तिकीट अन् मार्ग.. जाणून घ्या सर्वकाही

Kannad Crime : फार्मसी कॉलेजच्या विद्यार्थीं-विद्यार्थींनींना सहा गुंडाकडून रस्त्यावर दगडी फरशीने मारहाण; रिक्षा चालक आरोपी ताब्यात, पाच जण फरार

Pune Crime : वनराज आंदेकर खून प्रकरण; प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या समोर होणार आरोपींची ओळख परेड

Akshay Shinde Encounter: ''अक्षय शिंदेचा एन्काऊंटर बनावट'' वडिलांची हायकोर्टात धाव, SIT चौकशीची मागणी

SCROLL FOR NEXT