Pune Rain Update esakal
पुणे

Pune Rain Update : लोहगावात पाणी की पाण्यात लोहगाव? पाण्यातून मार्ग काढताना नागरिकांना अक्षरश: कोसळलं रडू

सकाळ डिजिटल टीम

लोहगाव : कोणाची गाडी पाण्यात बंद पडली, तर कोणाची गाडी खड्ड्यात अडकली. कोणी बॅग डोक्यावर घेऊन चालू लागलं; तर कोणी हातात चपला घेऊन. कोणी गाडी सोडून घर गाठलं, तर कोणी हेल्मेट घालूनचं पायपीट केली. ही अवस्था होती लोहगाव-धानोरी रस्त्याची. लोहगाव-धानोरी रस्त्यावर एकनाथराव खेसे विद्यालयाजवळ कमरे इतके पाणी साचल्याने त्या पाण्यातून मार्ग काढतांना नागरीकांना अक्षरश: रडू कोसळले.

या पाण्यातून मार्ग काढलेल्या वैशाली राऊत म्हणाल्या, 'दरवर्षी पावसांत ही अशीच अवस्था असते. आम्ही पालिकेला कर भरतो, पण त्या बदल्यात पालिका आम्हाला असा त्रास देते. आम्ही कररुपी पैसे देऊन त्रास विकत घेत आहोत की काय? हाच प्रश्न आम्हाला पडलेला आहे.' लोहगाव-वाघोली रस्त्यावर योजना नगर परिसरात पाण्याचे तळे साचले आहे. त्या पाण्यातून वाट काढत असलेल्या सोनाली राठोड म्हणाल्या, 'या पाण्यात गाडी घातल्यास गाडी बंद पडते. पर्यायी मार्गाने जायचे झाल्यास दोन किलोमीटर वळसा घालून जावे लागले. सहा वाजता ऑफिस सुटल्यानंतर घरी पोहचायला रात्रीचे साडे-आठ वाजले.'

विमानतळ रस्त्यावर झाड पडून वाहतूक कोंडी झाली. त्यात वायुसेनेच्या भिंतीमुळे रस्त्यावर पाण्याचे तळे साठले. या पाण्यातून वाट काढत असलेले मोहन गायके म्हणाले, 'खेसे पार्क परिसरात पाणी साचल्याने गाडी बंद पडली, बरेच प्रयत्न करुनही गाडी चालू झाली नाही. शेवटी खेसे पार्क ते खंडोबा माळ अशी चार किलोमीटर गाडी ढकलावी लागली.' संत तुकाराम महाराज मंदिर परिसरातील महादेव मंदिरात पाणी शिरले. महादेव पिंड पाण्याखाली गेली असून त्याठिकाणीही कमरे इतके पाणी साचलेले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : आता वाट बघा! लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी? नवीन सरकार...

Share Market Today: अमेरिकन बाजार नव्या उच्चांकावर; पण गिफ्ट निफ्टी घसरला, आज कोणते शेअर्स असतील तेजीत?

Kopargaon Assembly election 2024 : कोपरगाव विधानसभेत काळे अन् कोल्हेंत पुन्हा चुरस

Shrigonda assembly election 2024 : श्रीगोंदा विधानसभा मतदारसंघात प्रस्थापितांची उमेदवारीसाठी रस्सीखेच

Latest Maharashtra News Updates : भाजपची पहिली यादी आज जाहीर होण्याची शक्यता; 100 पेक्षा जास्त उमेदवारांची होणार घोषणा?

SCROLL FOR NEXT