Pune Water Cut:  sakal
पुणे

Pune Water Cut: पुणेकरांनो लक्ष द्या, शहरातील 'या' भागात गुरुवारी येणार नाही पाणी

Pune Latest Update: महापालिका प्रशासनाकडून पाणी गळती थांबविण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे

सकाळ वृत्तसेवा

Latest Pune News: स्वारगेट मेट्रो स्थानकासमोर मोठ्या प्रमाणात पाणी गळती होत असल्याने महापालिका प्रशासनाकडून पाणी गळती थांबविण्यासाठी जलवाहिनी दुरुस्तीचे काम केले जाणार आहे.

त्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागातील काही पेठांसह पूर्व भागामध्ये गुरुवारी (ता.२५) रोजी पाणी पुरवठा बंद राहणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाने दिली.

पर्वती जलकेंद्रामध्ये येत असलेल्या एमएलआर टाकीवरून भवानी पेठेकडे जाणाऱ्या ६०० मिलिमीटर व्यासाच्या जलवाहिनीवर स्वारगेट मेट्रो स्थानकाच्यासमोर मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू आहे. ही गळती थांबविण्यासाठी संबंधित भागातील पाणी पुरवठा गुरुवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पाणी पुरवठा विभागाच्यावतीने देण्यात आली.

पाणी पुरवठा बंद असणारा परिसर पुढीलप्रमाणे

शंकरशेठ रस्ता परिसर, गुरुवार पेठ, बुधवार पेठ, कासेवाडी, क्वार्टरगेट, महात्मा फुले पेठ, भवानी पेठ, नाना पेठ, लोहियानगर, सोमवार पेठ, अरुण कुमार वैद्य स्टेडीयम, घोरपडे पेठ, लक्ष्मीनारायण टॉकीजमागील काही भाग, सारसबाग परिसर, खडकमाळ आळी, शिवाजी रोड परिसर, मुकुंदनगर, महर्षीनगरचा काही भाग, टीएमव्ही कॉलनी, मीनाताई ठाकरे औद्योगिक वसाहत, अप्सरा टॉकीज परिसर, मीरा आनंद परिसर, श्रेयस सोसायटी.

( Navi Peth, Sadashiv Peth, Deccan, Camp, Manapa, Guruwar Peth, Budhwar Peth, Kasewadi, Bhawani Peth, Nana Peth, Lohia nagar, Somwar Peth, Sarasbagh Area, Khadakmal Ali, Shivaji Road Premises, Mukund nagar, Meenatai Thackeray Industrial Estate, Apsara Talkies Premises,)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhan Rate: हंगामाच्या सुरुवातीलाच धान पिकाला विक्रमी दर; ‘ए’ ग्रेड’ला 2700 रुपयांचा दर

Ajit Pawar : ‘सहा महिन्यांत शेतकऱ्यांना दिवसाही होणार वीजपुरवठा’

Maharashtra Election: मतदारांना भुलवण्यासाठी गैरप्रकारांचा सुळसुळाट! आचारसंहिता भंगाच्या ६ हजारापेक्षा अधिक तक्रारी

Latest Maharashtra News Updates : देश-विदेशात दिवसभरात काय घडलं? जाणून घ्या एका क्लिकवर

Ultraman Dashrath Jadhav : डोर्लेवाडीतील लोहपुरुष ठरला ‘अल्ट्रामॅन’चा मानकरी; दशरथ जाधव यांनी वयाच्या ६६ व्या वर्षी जिंकली अत्यंत खडतर स्पर्धा

SCROLL FOR NEXT