Pune News: सर्दी, खोकला, दमा तसेच श्वसनाचे वेगवेगळे विकार असलेल्या रुग्णांनो कामाशिवाय घराबाहेर पडू नका. कारण, पुण्यातील हवेची गुणवत्ता ढासळत आहे. हवेत सूक्ष्म (पीएम १०) आणि अतिसूक्ष्म धूलिकणांचे (पीएम २.५) प्रमाण सातत्याने वाढत असून, वाहनांच्या धुरांमधून बाहेर पडणाऱ्या विषारी वायूंमुळे हवेची गुणवत्ता सलग दुसऱ्या दिवशी दूषित राहिली असल्याचे निरीक्षण नोंदविण्यात आले.
‘भारतीय उष्ण कटिबंधीय हवामान संस्थे’च्या (आयआयटीएम) ‘सफर’ (सिस्टिम ऑफ एअर क्वालिटी अँड वेदर फोरकास्टिंग अँड रिसर्च) यांच्यातर्फे नोंदविण्यात आलेल्या निरीक्षणातून ही माहिती पुढे आली.
थंडी वाढल्याने शहरातील हवेची गुणवत्ता ढासळली आहे. हवेत तरंगणारे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकणांबरोबरच वाहनांच्या धुरातून बाहेर पडणाऱ्या प्रदूषकांमुळे हवेची गुणवत्ता सलग दुसऱ्या दिवशी कमी झाली.
दीर्घकाळ प्रदूषित हवेत
काम करू नका
अतिशारीरिक श्रमाची कामे टाळा
सर्दी, खोकला असलेल्यांनी कामाशिवाय घराबाहेरपडू नका
श्वसनाचे विकार असलेल्यांनी प्रदूषित हवेत बाहेर पडणे टाळा
शहरात ७ फेब्रुवारीला किमान तापमान १६.१ अंश सेल्सिअस नोंदले गेले. त्यानंतर सातत्याने हवेतील गारठा वाढला. रविवारी (ता. ११) हे तापमान ११.६ अंश सेल्सिअसपर्यंत खाली घसरले. त्यानंतर पुढील दोन दिवस म्हणजे सोमवारी (ता. १२) १३.१ आणि मंगळवारी (ता. १३) १२.७ अंश सेल्सिअस नोंदले. शहरात थंडी वाढल्याने हवेच्या प्रदूषणात वाढ झाली.
शहरात शनिवारी (ता. १०) ३५.८ अंश सेल्सिअसपर्यंत वाढलेले कमाल तापमानही ३३.६ अंश सेल्सिअसपर्यंत कमी झाले.
शहरात थंडी वाढल्याने हवेचे अभिसरण कमी झाले. उन्हामुळे तापलेल्या जमिनीलगतची हवा तापते. उष्ण हवा हलकी होऊन हवेच्या वरच्या स्तरात जाते. त्याची जागा जड असलेली थंड हवा घेते. अशा हवेच्या अभिसरणाचा वेग कमी झाला. त्यामुळे हवेतील प्रदूषक घटक जमिनीला समांतर राहू लागले. त्यातून हवेची गुणवत्ता गेल्या दोन दिवसांमध्ये ढासळली.
शहरातील हवेची गुणवत्ता मध्यम स्थिती ( १३१) आहे. शहरातील प्रदूषित हवेचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. हवेत तरंगणारे सूक्ष्म आणि अतिसूक्ष्म धूलिकण कान आणि तोंडावाटे सहज शरीरात प्रवेश करतात. त्यातून श्वसनसंस्थेच्या विकाराचा धोका वाढतो. नियमित मास्क वापरल्याने याचा धोका काही अंशी कमी करणे शक्य असते. तसेच काही विषारी वायूचे कणही श्वासाबरोबर शरीरात जातात. त्यातून दीर्घकालीन धोका वाढतो.
- डॉ. समीर भावे
भाग - हवेच्या गुणवत्तेची सद्यःस्थिती
भोसरी -मध्यम
कात्रज -मध्यम
शिवाजीनगर -मध्यम
हडपसर- मध्यम
निगडी -मध्यम
भूमकर चौक-मध्यम
कोथरूड- मध्यम
पाषाण- चांगली
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.