Dam Water sakal
पुणे

Water Storage : पुणे शहर व जिल्ह्यात फक्त १३ टीएमसी पाणीसाठा शिल्लक

पावसाची हजेरी, धरणे मात्र कोरडी.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - पुणे शहर व जिल्ह्यात यंदा पावसाळ्याच्या सुरुवातीलाच म्हणजेच जून महिन्याच्या पहिल्याच दहा दिवसांत सरासरी ८८.९० मिलिमीटर पाऊस पडला आहे. जिल्ह्यातील जून महिन्यातील एकूण सरासरी पावसाच्या निम्म्याहून अधिक पाऊस या दहा दिवसांत झाला आहे.

पण, जिल्ह्यातील धरणांमधील उपलब्ध पाणीसाठ्यात मात्र किंचितही वाढ झालेली नाही. याउलट गेल्या वर्षीच्या तुलनेत अद्यापही धरणांमधील पाणीसाठा खूपच कमी झालेला आहे. सध्या जिल्ह्यातील सर्व धरणांमध्ये मिळून फक्त १३.०७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण केवळ ६.५९ टक्के इतके आहे.

गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमधील एकूण उपलब्ध पाणीसाठा १९.७० टीएमसी इतका होता. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा हा पाणीसाठा ६.६३ टीएमसी इतका कमी आहे. जिल्ह्यातील धरणांमधील उपयुक्त पाणीसाठ्याने आता तळ गाठला आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा उपलब्ध पाणीसाठ्याची अवस्था खूपच बिकट झाली आहे. सद्यःस्थितीत नाझरे धरण ठणठणीत कोरडे पडले आहे. अन्य बारा धरणांमधील उपयुक्त पाणीसाठा हा दहा टक्क्यांच्या खाली गेला आहे.

‘टाटां’च्या धरणांत ९.४१ टीएमसी उपयुक्त साठा

पुणे जिल्ह्यात शासकीय २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाची सहा धरणे आहेत. त्यामध्ये मुळशी, ठोकरवाडी, शिरोटा, वळवण, लोणावळा आणि कुंडली यांचा समावेश आहे. या सहा धरणांची एकूण पाणी साठवणक्षमता ४२.७६ टीएमसी इतकी आहे. त्यात सध्या ९.४१ टीएमसी (२२ टक्के) उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. या सहापैकी लोणावळा हे धरण कोरडे पडले आहे.

प्रमुख धरणांमधील आजचा पाणीसाठा (टीएमसीमध्ये) (कंसात गतवर्षीचा आजचा पाणीसाठा)

पवना - १.७९ (१.८३)

चासकमान - ०.५३ (०.६२)

भामा आसखेड - १.१८ (२.०१)

आंद्रा - ०.७५ (१.२५)

गुंजवणी - ०.४४ (०.६४)

भाटघर - १.४३ (१.४१)

नीरा देवघर - ०.९८ (०.७४)

वीर - १.८४ (२.०२)

माणिकडोह - ०.१८ (०.५०)

येडगाव - ०.८४ (०.७९)

डिंभे - ०.०३ (१.२५)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parliament Session: संसदेचे हिवाळी अधिवेशन 25 नोव्हेंबरपासून, 'या' मुद्द्यांवरुन होणार घमासान

Olympic 2036 च्या आयोजनासाठी भारत सज्ज; IOC कडे पत्र पाठवून व्यक्त केली यजमानपदाची इच्छा

Nagpur AIIMS Recruitment: नागपूर एम्समध्ये विविध विभागांसाठी ‘ग्रुप-ए’ पदांची थेट भरती, पगार २ लाख रुपये; असा करा अर्ज

Gold Investment : महिला आणि संपत्ती: तरुणींमध्ये सोन्यात गुंतवणूक करण्याचा वाढता कल

Latest Marathi News Updates live : भाजप नवाब मलिक यांचा प्रचार करणार नाही

SCROLL FOR NEXT