Ashadhi Ekadashi Pandharpur
Ashadhi Ekadashi Pandharpur esakal
पुणे

Ashadhi Wari 2024 : आषाढी वारीत विस्कळित पाणी पुरवठ्याचे विघ्न; वारकऱ्यांची होणार गैरसोय?

सकाळ डिजिटल टीम

खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रात ३ हजार मिमी व्यासाची दुसऱ्या जलवाहिनीतून ग्रॅव्हिटीतून पाणी पुरवठा केला जातो.

पुणे : आषाढी वारीच्या निमित्ताने (Ashadhi Ekadashi Pandharpur) लाखो वारकरी पुण्यात विशेषतः मध्यवर्ती पेठांमध्ये दोन दिवस मुक्कामी असताना शहरावर विस्कळित पाणी पुरवठ्याचे विघ्न ओढवले आहे. आज (ता. २९) सकाळी खडकवासला जॅकवेल (Khadakwasla Jack Well) येथे शॉर्टसर्किट झाल्याने पर्वती जलकेंद्राला होणारा पाणी पुरवठा बंद झाला. त्याचा परिणाम जवळपास संपूर्ण शहरावर झाला. अचानक पाणी न आल्याने नागरिकांची प्रचंड तारांबळ उडाली. तर, वारीच्या पार्श्‍वभूमीवर महापालिकेने दुरुस्तीचे काम हाती घेतले असून, रात्री बारा पासून पाणी पुरवठा सुरु होईल असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

पुणे शहराला खडकवासला धरणातून (Khadakwasla Dam) पाणी पुरवठा होतो, त्याठिकाणी ५०० एमएलडी क्षमतेचे जॅकवेल असून, त्यातून मोठ्या जलवाहिनीतून पर्वती जलशुद्धीकरण केंद्रात पाणी पुरवठा केला जातो. पर्वतीमध्ये पाणी शुद्ध केल्यानंतर शहराच्या विविध भागात पाणी वितरण केले जाते. आज सकाळी साडे सहाच्या सुमारास जॅकवेलमधील विद्युत पुरवठा करणाऱ्या २२ केव्ही केंद्रातील कंट्रोल पॅनेल खराब होऊन मोठे शॉटसर्किट झाले. त्यात अनेक उपकरणे जळाल्याने जॅकवेलमधून पर्वती जलकेंद्राकडे पाणी पाठविण्याचे काम बंद पडले. त्यामुळे काही वेळातच शहराच्या बहुतांश भागातील पाणी पुरवठा बंद झाला.

पाणी पुरवठा विभागाला (Water Supply Department) याची माहिती मिळताच दुरुस्तीचे काम सुरु झाले. कंट्रोल पॅनेलमधील उपकरणे बदलण्याचे काम सुरु असून, संध्याकाळी सहा पर्यंत हे काम पूर्ण होईल. त्यानंतर खडकवासला जॅकवेलमधून पर्वती जलकेंद्राला पाणी पुरवठा सुरु होईल. पाणी शुद्धीकरण करण्याची प्रक्रिया पूर्ण करून रात्री १२च्या सुमारास सर्व भागात पाणी पुरवठा सुरु होईल, असे प्रशासनातर्फे सांगण्यात आले आहे.

पेठांसाठी पर्यायी व्यवस्था

खडकवासला धरणातून पर्वती जलकेंद्रात ३ हजार मिमी व्यासाची दुसऱ्या जलवाहिनीतून ग्रॅव्हिटीतून पाणी पुरवठा केला जातो. आषाढी वारी शहरात येत असताना पालखी मार्ग आणि पेठांमधील पाणी पुरवठा विस्कळित होऊ नये यासाठी या जलवाहिनीतून प्राधान्याने पेठांना पाणी पुरवठा करण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. दुपारी चार नंतर पेठांमधील पाणी पुरवठा सुरु होईल, असे नंदकिशोर जगताप यांनी सांगितले.

'या' भागातील पाणी पुरवठा विस्कळित

जॅकवेल बंद पडल्यानंतर अवघ्या काही वेळात सर्व पेठा, बिबवेवाडी, सहकारनगर, मुकुंदनगर, पर्वती, गंगाधाम, एसएनडीटी, गोखलेनगर,कोथरूड, डहाणूकर कॉलनी, चतुःश्रृंगी परिसर, येरवडा, संपूर्ण हडपसर, सोलापूर रस्ता, महंमदवाडी, रेसकोर्स, खराडी, येरवडा, संपूर्ण कात्रज, आंबेगाव, धनकवडी, सुखसागरनगर, केदारेश्‍वर टाकी येथील पाणी पुरवठा विस्कळित झाला.

खडकवासला जॅकवेल येथे सकाळी साडेसहाच्या सुमारास शॉर्टसर्किटमुळे पाणी पुरवठा यंत्रणा बंद पडली. त्यामुळे शहराच्या विविध भागातील पाणी पुरवठा विस्कळित झाला आहे. पण युद्धपातळीवर दुरुस्तीचे काम सुरु असून, आज रात्री १२पर्यंत पाणी पुरवठा सुरु होईल. त्यामुळे आषाढी वारीसाठी आलेल्या वारकऱ्यांची गैरसोय होणार नाही. आमची यंत्रणा सतर्क आहे.

-नंदकिशोर जगताप, प्रमुख, पाणी पुरवठा विभाग

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran's New President: कट्टरपंथी इराणच्या अध्यक्षपदी पुरोगामी पेझेश्कियान; जाणून घ्या इथून पुढे कसे असणार भारत-इराण संंबंध

Ashadhi Wari 2024 : चांदीच्या मेघडंबरीत विसावली विठुमाउली; नांदेडच्या भाविकाकडून तब्बल 2 कोटी 45 लाखांची चांदी अर्पण

K Armstrong: कोण होते तामिळनाडू बसपा प्रमुख आर्मस्ट्राँग? ज्यांची भररस्त्यात झाली हत्या

Ashadhi Palkhi Sohala : माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींनंतर CM शिंदे प्रथमच आषाढी यात्रेत वाखरी ते पंढरपूर चालणार

Maharashtra Live News Updates : घड्याळ कुणाचं? 16 जुलैला सुप्रीम कोर्टात सुनावणी

SCROLL FOR NEXT